Shivsena Nanded news: शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थिततीत सोमवारी नांदेड (Nanded News) येथे कार्यकर्त्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)  यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत टीकेचा सूर लावला. हजारो कोटींचा निधी मिळूनही महापालिकेत यश मिळाले नसल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या समोर रोष व्यक्त केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. मी तुमचं ऐकण्यासाठी आलो आहे. हा पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) चालवत आहेत. इतका निधी देऊनही जागा मिळत नसतील, तर त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या परिस्थितीवरून त्यांनी आमदारांचे कान टोचत कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची सूचनाही दिली. (Maharashtra Politic news)

Operation Tiger Shivsena: ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, आम्हाला पक्ष 2029 पर्यंत मजबूत करायचा आहे: 

कल्याण डोंबिवली चे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज तीन जिल्ह्यांची आढावा बैठक ही नांदेडमध्ये पार पडली ही बैठक पक्ष मजबूत करण्यासाठी होती संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपले नेते शी बोलता येत नसते त्यांच्या समस्या जाणून घेता येत नाही त्या जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले ऑपरेशन टायगर असं काही नाही माध्यमांनीच बातमी देऊ ऑपरेशन टायगर वर चर्चा सुरू केली आहे पक्षाचे ध्येय वेगळं आहे आम्हाला 2019 पर्यंत शिवसेना मजबूत करायचं आहे अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

Santosh Banger Hingoli news: मंत्री फोन उचलत नाहीत, उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा: संतोष बांगर

नांदेडमधील मेळाव्यात शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांनीही त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. संतोष बांगर यांनी युतीच्या मंत्र्यांना विशेष करुन शिंदे गटाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. फोन उचलत नाहीत अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी संतोष बांगर यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली, 'ते' मेसेज सापडताच पटापट चक्रं फिरली अन्...