Manoj Jarange Patil नांदेड : फडणवीस भुजबळांना (Chhagan Bhujbal) बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. फडणवीस यांनी भुजबळ यांना यासाठीच मंत्रीपद दिलं आहे का? मराठ्यांचे 2-4 माकडं फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर साधला आहे. नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.  


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शांतता रॅलीचा आज चौथा दिवस आहे. आता तिसऱ्या जिल्ह्यात दौरा झाला आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 


भुजबळांना यासाठीच मंत्रिपद दिलं का? 


मुठभर मराठा नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस संपूर्ण समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत. पण जातीच्या लोकांनी त्यांना दाखवून दिले आहे, तुम्ही नेत्यांना मोठं करा समाज तुम्हाला योग्यवेळी उत्तर देईल. मी अजूनही सांगतो देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण त्यांनी आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे, असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला होता. यावर मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांना समजून सांगितले आहे. त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा. ते जनतेशी खुणशीने वागतात. हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांच्यामुळे गरिबांचे वाटोळे होत आहे. हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे.  त्यांना वाटते की, नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली. आता त्यांनी भुजबळ यांना जवळ केलं आहे. फडणवीस भुजबळांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिलं आहे का? मराठ्यांचे 2-4 माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 


आम्हाला गॅझेट सुद्धा लागू पाहिजे


ते मंत्री म्हणतात हे आरक्षण टिकणार नाही. म्हणजे आरक्षण हेच देणार आणि उडवणार हेच. सगेसोयरे अंमलबजावणी हे देणार आणि आणखी उडवणार हे नक्की आहे. सरसकटने यांचं फार पोट दुखतं. सगेसोयरे अंमलबजावणी यांनीच द्यायची आणि टिकवायची जबाबदारी सुद्धा यांचीच राहील, आम्हाला गॅझेट सुद्धा लागू पाहिजे. शंभूराजे देसाई यांच्याशी काल रात्री बोललो आहे. गॅझेट अंमलबजावणी होणार, असं त्यांनी सांगितलं आहे. सगेसोयरे अंमलबजावणी आमच्या पद्धतीने आम्हाला हवी, असं त्यांना आम्ही सांगितलं आहे, अशी माहिती जरांगे यांनी यावेळी दिली.  


शेवटचा माणूस सगेसोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही


डेडलाईन बद्दल काहीही चर्चा झाली नाही ते देतील आणि टिकवतील. सौम्य पद्धतीने मी सरकारवर टीका करावी, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मागण्यांवर अंमलबजावणी करावी. मराठा समाजातील शेवटचा माणूस सगेसोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. 


मुलींची फी घेतली ती परत करा


एसबीसी आणि ईडब्ल्यूएसबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मी 4-5 दिवसांपूर्वी बोललो होतो. मुलींसाठी 100 टक्के शिक्षण केलं होतं. त्याची अंमलबजावणी केली असेल तर त्यांचं अभिनंदन. सगळ्यांच्या लेकींना त्यांच्यामुळे न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचं कौतुक पण अ‍ॅडमिशन घेताना जी मुलींची फी घेतली ती परत करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मला गावठी म्हणतात, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय काय? मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना संतप्त सवाल