Eknath Shinde, Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणाहून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. नांदेड येथेही शिवसेनेला धक्का बसलाय. युवा सेनेच्या 35 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय. तसेच जिल्हाध्यक्ष उमेश मुंडेही शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत. ते एकनाथ शिंदे गटात दाखल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेड दौऱ्यावर आहेत, यावेळी पक्षप्रवेस होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगमनापूर्वी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडलंय. ज्यात युवा सेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शिवसेनेला रामराम ठोकलाय. तर शिवसेना जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे व अनेक तालुका अध्यक्ष शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर खासदार हेमंत पाटील यांचीही भेट घेतलीय. दरम्यान निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करत युवा सेनेच्या 35 पदाधिकारी, कार्यकर्त्यानी पदाचे राजीनामे दिले आहेत... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेडात दाखल होणार असून उद्या ते नांदेड जिल्ह्यातील विविध भागाचा दौरा व भूमिपूजन करणार आहेत. आणि त्यापूर्वीच शिवसेनेतील नाराजांच्या फौजानी, नाराजीचा सूर आवळला आहे.. आदित्य ठाकरे यांनी काल युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली, त्यात नांदेडच्या निष्ठावंतांना डावलल्याने पदाधिकाऱ्यांनी राजिनामाअस्त्र बाहेर काढले आहे. दरम्यान हे पदाधिकारी कुठल्याही गटात जाणार नसल्याचे तूर्तास तरी त्यांचे म्हणणे आहे. पण सुत्रांच्या माहितीनुसार, ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करु शकतात.
मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला गावठी पिस्टलसह तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.
आज रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड शहरात दाखल होत आसतानाच, त्यांच्या आगमनाच्या पूर्व संध्येला ही घटना उघडकीस आलीय. नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर एक इसम स्वतः जवळ पिस्टल बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चिखलीकर यांना मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन शिवाजी मोरे वय 19 रा नांदेड यांची झडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेले एक पिस्टल आढळून आले. या बाबतीत चौकशी केली आसता सदरचे पिस्टल हे संतोष कदम वय 21, शुभम कदम वय 21 यांनी दिल्याचे सांगितले. दरम्यान या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.