Nanded News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नांदेड जिल्ह्याच्या  (Nanded District) दौऱ्यावर आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थित अबचलनगर मैदानावर 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाभार्थी, नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील सहा रस्त्यांवरील वाहतूक पोलीस प्रशासनाने बंद केली आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. तर सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत निर्णय लागू असणार आहे. 


'या' रस्त्यांवरील वाहतूक बंद



  • आसना ते विमानतळ पॉईंट, शिवमंदिर, राज कॉर्नर, वर्कशॉप, भाग्यनगर, आनंदनगर, नाईक चौक अण्णा भाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर

  • नाईक चौक ते महाराणा प्रताप चौक ते बाफना टी पॉईंट रस्ता. देगलूर नाका ते बाफना टी पॉईंट ते हिंगोली गेट रस्ता.

  • यात्री निवास ते अबचलनगर कमान, वर्कशॉप ते आयटीआय चौकपर्यंतचा रस्ता


असे असणार पर्यायी मार्ग 



  • पूर्णा रोडवरून येणारी छोटी वाहने छत्रपती चौक मार्गे पावडेवाडी नाका, गणेशनगर वाय पॉईंट, फुले मार्केटमार्गे शहरात येतील. मोठी वाहने शेतकरी पुतळा, कॅनॉल रोड, साई मंदिर, नवीन आसना बायपासने महामार्गावरून बाहेर जातील.

  • मालेगाव रोडने येणारी मोठी वाहने पासदगाव, संकेत हॉस्टेल तरोडामार्गे आसना हायवेकडे जातील, छोटी वाहने गजानन मंदिर, भावसार चौक, शेतकरी पुतळा, छत्रपती चौकमार्गे पावडेवाडी नाका, फुले मार्केट रोडने वाहतूक करतील.

  • वाजेगावकडून येणारी छोटी वाहने बाजेगाव, देगलूर नाका, मालटेकडी रोडचा आणि देगलूर नाका ते बर्फी चौक जुना मोंढा रस्त्याचा वापर करतील, मोठी वाहने वाजेगाव ते धनेगावमार्गे बायपास वापरतील. जुना मोंढा ते कविता रेस्टॉरंट ते बाफना टी पॉईंटकडे येणारी वाहतूक देना बँक, महावीर चौक, वजीराबाद चौक या रस्त्याचा वापर करतील.


अशी असणार वाहनतळ व्यवस्था....



  • लोहा, कंधार तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने  भगतसिंग चौक-कौठा-एसपी ऑफीस-शिवाजी पुतळा-चिखलवाडी कॉर्नर-यात्री निवास या मार्गाने येतील. 

  • धर्माबाद, उमरी येथून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. या तालुक्यातून येणारी वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास येथे थांबतील.

  • नायगाव, मुखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने चंदासिंग कॉर्नर-लातूर फाटा-जुना मोढा-अबचलनगर कमान येथून येतील.

  • किनवट, माहूर येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास-अबचलनगर कमान-फतेहसिंह मंगल कार्यालय येथे थांबतील.

  • सर्व शासकीय वाहने यांच्यासाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे.

  • नांदेड ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र (सीआरसी) येथे व्यवस्था केली आहे. ही वाहने देगलूर नाका-सीआरसी गेट क्रमांक. 1 द्वारे बाफना फ्लाय ओहर मार्गे गेट क्रमांक 1 द्वारे प्रवेश करतील. मुदखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली असून ही वाहने देगलूर नाका-सीआरससी गेट क्र. 2 द्वारे प्रवेश आहे.

  • बिलोली, देगलूर, भोकर येथून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था बाबा पेट्रोलपंप, कापूस संशोधन केंद्रासमोर करण्यात आली आहे. ही वाहने देगलूर नाका मार्गे डावीकडे वळून आत प्रवेश करतील. अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर येथून येणारी वाहने खालसा हायस्कूल नांदेड येथे थांबतील. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-फ्लाय ओहर-म्युझियम-हिंगोली फ्लाय ओहर खालून उजवीकडे वळून प्रवेश आहे.

  • नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्यासाठी हिंगोली गेट मैदान नांदेड येथे थांबतील. पदाधिकारी खाजगी वाहने (चार चाकी आणि दुचाकी) यांच्या वाहनांची व्यवस्था हिंगोली गेट मैदान नांदेड येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nanded News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या नांदेड दौऱ्यावर, जाहीर सभाही होणार