Nanded News : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी बुधवारी नांदेड जिल्हा न्यायालयात (Nanded District Court) हजेरी लावली. 2011 मध्ये विनापरवानगी सभा आणि रॅली काढल्या प्रकरणात एमआयएमचे (MIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ओवैसी यांना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर बुधवारी ते नांदेड न्यायालयात दाखल झाले. तर सुनावणीअंती न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. 


2011 मध्ये नांदेड महानगरपालिकेची पोटनिवडणूक झाली होती. प्रचारादरम्यान विनापरवानगी सभा घेतली आणि रॅली काढल्याच्या आरोपावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इतर कार्यकत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर न्यायालयाने अनेक वेळा खासदार ओवैसी यांना समन्स बजावले, परंतु ओवैसी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. 12 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खासदार ओवैसी नांदेड न्यायालयामध्ये दाखल झाले. त्यानंतर दंड आकारून न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 


न्यायालयाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविला होता


खासदार ओवैसी यांना नांदेड जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यावर ओवैसी 12 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर झाले. दरम्यान ओवैसी येणार असल्याने कार्यकर्ते न्यायालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर खासदार ओवैसी यांना दंड आकारून न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र खासदार ओवैसी न्यायालयात हजर होणार असल्याने जिल्हा न्यायालयाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविला होता.


समान नागरी कायद्याचा हिंदूना सर्वाधिक त्रास


समान नागरी कायदा (Uniform Civil Code) हा आधीपासूनच आरएसएस, जनसंघ आणि आता भाजपचा अजेंडा राहिला आहे. भारताची संस्कृती भाजपला मान्य नाही. त्यामुळे देशात समान नागरी कायदा आणण्याबाबत भाजप बोलत आहे. भारताच्या संविधानात दारू बंदी करावी असा उल्लेख आहे, देशांची संपत्ती सर्वाना समान वाटप करण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे देखील भाजप करणार आहेत का? असा प्रश्न ओवैसी यांनी विचारला. समान नागरी कायदा आल्यावर याचा हिंदुना सर्वाधिक त्रास होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या आदिवासी भागात जाऊन हा कायदा आणणार असल्याचे बोलून दाखवावे असेही ओवैसी म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Uniform Civil Code : समान नागरी कायद्याविरोधात असदुद्दीन ओवैसींकडून औरंगाबादेत चर्चासत्र