Continues below advertisement

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू, अशा आश्वासक शब्दांत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त (Nanded Flood) नागरिकांना धीर दिला.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मणार धरण परिसरातील बहाद्दरपुरा, शेकापूर, घोडज पूरबाधित नागरिकांशी त्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व्हिडओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.

Continues below advertisement

Ajit Pawar On Marathwada Flood : कुठे मदत लागेल याचा आढावा

दरम्यान, बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उपमुख्यमंत्री पवार यांना व्हिडओ कॉल आला. या कॉलदरम्यान पवार यांनी नांदेड जिल्ह्यात नेमक्या कोणत्या भागांत नागरिक अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर किंवा आर्मीची मदत घेण्याची आवश्यकता आहे का? एनडीआरएफचे पथक तातडीने पाठवावे लागेल का याबाबत सविस्तर माहिती घेतली.

“या संकटाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या जातील. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाईल. काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. यानिमित्ताने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन सर्वांना झाले.

Dharashiv Rain : पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, ओमराजे निंबाळकरांची मागणी

धाराशिवमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. धाराशिवसह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी. तसंच शेतकऱ्यांना एनडीआरएफमधून मदत करावी अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघासह पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची ओमराजेंनी शाहांना माहिती दिली. पाऊस नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचं, शेतीच मोठे नुकसान झालं आहे. नद्यांचे पाणी गावात असल्यामुळे अनेक घराची पडझड झाली, नुकसान झालं. त्यामुळे या भागात राष्ट्रीय आपत्ती घोषित करून एनडीआरएफमधून मदत करावी अशी मागणी निंबाळकरांनी केली.

Dharashiv Collector News : जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग

धाराशिव जिल्ह्यासह अवघा मराठवाडा पुरात बुडालेला असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग झालेले दिसून आले. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातला व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मोठा वाद उफाळून आला. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाचगाण्यात रमलेले पाहायला मिळाले. तुळजापूरच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमातला डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्याने त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. दरम्यान, झालेल्या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक जारी करत दिलगिरी व्यक्त केली.