लेकाला पोटाशी बांधून तलावात उडी, मायलेकाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2018 10:54 AM (IST)
28 वर्षीय रुपाली आशिष गुज्जेवार आणि त्यांचा पाच वर्षांचा चिमुरडा अभिर आशिष गुज्जेवार यांनी आयुष्य संपवलं.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात तलावामध्ये मायलेकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. लेकाला पोटाशी कवटाळून विवाहितेने तलावात उडी मारुन आत्महत्या केली. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात मायलेकाचा मृतदेह आढळला होता. 28 वर्षीय रुपाली आशिष गुज्जेवार आणि त्यांचा पाच वर्षांचा चिमुरडा अभिर आशिष गुज्जेवार यांनी आयुष्य संपवलं. चंद्रपुरातील पीएच नगरमध्ये गुज्जेवार राहत होते. दोघं जण 19 तारखेच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. तलावात उडी मारण्यापूर्वीने आईने लेकाला उराशी कवटाळून बांधलं होतं. दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.