मुंबई: राज्याची उपराजधानी नागपूरात  (Nagpur) गेल्या फेब्रुवारी महिन्यातील विविध हत्या आणि अपराधांच्या घटनेने शहर (Nagpur Crime)  हादरले आहे. या गंभीर प्रकरणाचे पडसाद आज राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील उमटतांना दिसून आले. याविषयी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सभागृहात अनेक प्रश्न विचारात सत्ताधाऱ्यांसह गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धारेवर धरले.


गृहमंत्र्यांच्या नागपूरात गेल्या 20 दिवसांमध्ये13 खुन झाले असून हत्या सत्र थांबता थांबत नाहीये. मंत्रालयात गुन्हेगार रीलबाजी करून समाज मध्यमांवर प्रसारित करीत आहेत. तर एका सत्ताधारी नेत्याने आईवर आणि तिच्या मुलीवर अत्याचार केला आहे. असे अनेक प्रकार राज्यात घडत असतांना ⁠राज्याच्या गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली आहे का, असा प्रश्न विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गृहमंत्र्यांना विचारला आहे. राज्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असताना राज्याचे मुख्यमंत्री यांच मौन का आहे, अजित दादा देखील यावर काही का बोलत नाही असा प्रश्न देखील वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.


खरंच हे धर्माचे राज्य आहे का ?


नागपूर शहरात गेल्या फेब्रुवारी महिन्यातील 20 दिवसांमध्ये मध्ये 13 खुन झाले. यात एका प्रेस फोटोग्राफरचा देखील समावेश आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत गुंड सर्रास फिरत असल्याचे चित्र आहे. सोबतच मंत्रालयाच्या परिसरात हे गुंड रीलबाजी करून समाजात दहशत पसरवत आहेत. राज्यातील गुन्हेगारी विकोपाला जात असतानाच, नवी मुंबईतील सत्ताधारी पक्षाच्या एक नेत्याने आई आणि तिच्या मुलीवर अत्याच्यार केला आहे. राज्यात अशा प्रकारचे कृत्य घडत असतील तर या वर कोणी काही बोलणार आहे की नाही, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला. राज्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या या घटना बघितल्या तर या राज्याचे भविष्य काय असेल. अशा बलात्काराच्या घटना होत असताना राज्यकर्त्यांनी एकमेकांना टाळी देण्यापेक्षा त्या मायलेकीकडे एखादे शस्त्र दिले असतं तर सत्ताधारी नेत्याचा आज त्यांनी जीव घेतला असता. एकीकडे आम्ही छत्रपती शिवरायांचे नाव घेतो, प्रभू श्रीरामांचे नाव घेतो. मात्र खरंच हे धर्माचे राज्य आहे का असे प्रश्न देखील वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलतांना उपस्थित केला. 


....तर सर्वांची मान नजरेने खाली जाईल


आज राज्यात ऑर्केस्ट्राच्या नावावर उघडपणे डान्सबार सुरू आहे. या सर्वांवर पोलीसचा आशीर्वाद असल्यामुळेच या अशा घटना घडत आहे. निवडणुकांसाठी उभा राहणारा पैसा याच डान्सबार मधून पुरवला जातो का? असा प्रश्न देखील वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. याबाबत आम्ही पोलीस आयुक्तांना देखील अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे, याबाबत चौकशी करून जर का माहिती घेतली, तर सर्वांची मान नजरेने खाली जाईल, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले. 


या संस्कृतीचा तुम्ही समर्थन करणारे आहात का?


आपण सर्वांनी चिपळूण ची घटना देखील अनुभवली आहे. सुसंस्कृत राज्यामध्ये यापूर्वी कधीही असे झाले नाही. त्या ठिकाणी आई बहिणीवरून एकमेकांना शिव्या देण्यात आल्या. लोकप्रतिनिधीत जर आई बहिणींवरून शिव्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस तुम्ही दाखवणार आहात का? ते कारवाईस पात्र आहे की नाही? असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. खुल्या माईक वरून शिव्या आणि धमक्या दिल्या जात आहे. या संस्कृतीचा तुम्ही समर्थन करणारे आहात का? हे कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घालणारे तुम्ही आहात का,  असा प्रश्न देखील विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.


एक आमदार पोलीस आमचं काय वाकड करू शकेल, असे सर्रासपणे बोलत आहे. यांच्या खिशात पोलीस आहेत का? पुढे ते म्हणतात,  माझे कितीही व्हिडिओ काढले तरी कोणी काहीही करू शकत नाही. हे व्हिडिओ दाखवून दाखवून कोणाला दाखवतील, तर आपल्या बायकोला दाखवतील. खरंच हे धर्माचे राज्य आहे का? सध्या राज्याला खड्ड्यात घालण्याचे जोरदार काम या नेत्यांकडून सुरू आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल,  याचे उत्तर आम्हाला हवं असल्याचे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या