Rashmi Shukla in RSS Headquarters : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी संघ मुख्यालयाला (RSS Headquarters) भेट दिल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल संघ मुख्यालयाला भेट दिली.


पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला संघ मुख्यालयात


सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी संघ मुख्यालयात गेल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. त्यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि हेडगेवार स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रश्मी शुक्ला सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. संघ मुख्यालयात जाणाऱ्या त्या पहिल्या पोलीस महासंचालक ठरल्या.


रश्मी शुक्लांना दोन वर्षांची मुदतवाढ 


फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला दोन वर्ष पदावर कायम राहणार आहेत. रश्मी शुक्ला यावर्षी सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेत रश्मी शुक्ला यांची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी
आणखी चार महिने शिल्लक आहेत, त्याआधी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. 


फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांचं नाव


2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर ठेवण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आलेला होता. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक


जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. 


Rashmi Shukla : पाहा व्हिडीओ : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली संघ मुख्यालयाला भेट



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाची रिमझिम, काही भागात तापमानात वाढ! पुढील 24 तास पावसाचा अंदाज कायम