Vidhan Parishad Election Nagpur : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नगरसेवक काँग्रेसच्या गळाला लागणार नाही, यासाठी भाजपने आखलेली पर्यटनाची रणनीती त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. नागपुरात परतणाऱ्या सर्व भाजप नगरसेवकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. शिवाय, गरज पडल्यास या नगरसेवकांना संस्थात्मक विलगीकरण करण्याची मागणी नागपूरमध्ये काँग्रेसने केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या गळाला लागणार नाही, यासाठी भाजपने नगरसेवकांना गोव्याला गोव्याला पाठवलं होतं. पण भाजप आखलेली पर्यटनाची रणनीती त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण एका बाजूला काँग्रेस उमेदवार रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी 334 नगरसेवकांच्या विविध ठिकाणच्या सहलीसाठी आणि पंचतारांकित हॉटेल्समधील वास्तव्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च केल्याचा गंभीर आरोप केलाय... तर दुसर्या बाजूला पर्यटनावर गेलेले भाजपचे नगरसेवक नागपुरात परतताच प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करावी आणि गरज भासल्यास त्यांना विलगीकरणात पाठवावं अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांचा निवडणुकी पूर्वीचा विविध ठिकाणचा पर्यटन वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संदर्भात केंद्र तसेच राज्य सरकारने विविध मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. विमानतळांवर प्रवाशांची चाचणी ही सुरू झालेली आहे. अशा अवस्थेत पर्यटनाला गेलेले भाजप नगरसेवक विमानाने नागपुरात परतल्यावर त्यांच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा संक्रमण नव्याने पसरणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच पर्यटनावरून परत येणाऱ्या नगरसेवकांची सक्तीची आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी करावी अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये कुठलेच गट तट नाहीत. काँग्रेस एकजुटीने विधान परिषदेची निवडणूक लढवत असून त्याचे परिणाम मतमोजणीच्या दिवशी दिसून येतील असंही विकास ठाकरे म्हणाले.
नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. (Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule)
संबधित बातम्या :
निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर
MLC Elections : काँग्रेसकडून छोटू भोयर यांना विधानपरिषदेची उमेदवारी, बावनकुळेंविरोधात लढणार
'चंद्रशेखर बानकुळेंनी मला गंडवलं, 34 वर्ष साथ, तरीही पक्षाकडून अन्याय, आता राम राम करतोय', विदर्भात बड्या नेत्याचा भाजपला रामराम