नागपूर : 2019 वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनला कुठंतरी लांब जावं आणि मनमुराद आनंद नववर्षाच्या स्वागताचा घ्यावा असा तुम्ही प्लॅन करत असेल तर त्यासाठी योग्य स्थळ आहे ते म्हणजे विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेलं चिखलदरा. सध्या राज्यात थंडीने जोर धरला असून चिखलदरामध्ये तर दिवसभर थंड वारे वाहू लागले आहे. सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचे काश्मीर फुलून गेले आहे.

दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरुन कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ता, वातावरणात गारवा हाड गोठवणारी थंडी, मेळघाटातील चिखलदरा मधील सध्या राज्यात थँडीची लाट सुरू आहे. अशातच आधीच थंड वातावरण असलेल्या चिखलदरामध्ये थंडीने उच्चांक गाठला आहे. याच थंडीत चिखलदऱ्याचे सौंदर्य आणखी फुलले आहे. साधारणता जुलै महिन्यापासून चिखलदरा मधील पर्यटन हे सुरू होत असते. सध्या वातावरणात असलेला गारवा याचा आनंद लुटन्यासाठी त्यात ख्रिसमस नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातून पर्यटक दाखल झाले आहे.

हेही वाचा - नागपुरात सुमारे 500 गुंडांचे नवीन वर्ष पोलीस ठाण्यातच उजळणार

निसर्गात असलेली अद्भुत किमया इथं अनुभवायला मिळत असल्याचं पर्यटक सांगतात. चिखलदरामध्ये देवी पाईट, गाविडगड किल्ला तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाळावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळे पर्यटकाची पसंती देवी पॉईन्टला दिसून येत आहे. विदर्भाच्या या काश्मीरमध्ये विविध पाहण्याजोगे पॉईन्ट आहे. देवी पॉईन्ट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेता येतो. दैनंदिन कामात महिला वर्षभर व्यस्त असतात पण चिखलदरामध्ये आलो की वर्षभराचा ताण निघून जाऊन नवीन शक्ती या निसर्गातून मिळते असल्याचे महिला पर्यटक सांगतात.

समुद्र सपाटीपासून हजारो किलोमीटरवर असलेलं चिखलदरा हे पर्यटकांना भूरळ पाडणारे आहे. सोबतच जवळच असलेले सीमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारी साठी प्रसिद्ध असलेले कोलकास येथे पर्यटक जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. निसर्गाचा हा अदभूत नजरा साक्षात अनुभवायचा असेल आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर तुम्ही चिखलदरा प्लॅन करायला हरकत नाही.

Marriage Issue | विदर्भातील शेतकरी मुलांना नवरी मिळेना | नागपूर | ABP Majha