नागपूर  : वेगळ्या विदर्भ राज्याच्या  (Separate Vidarbha) मागणीसाठी सरकारला दिलेल्या 31 डिसेंबर पर्यंतच्या अल्टीमेटम नंतर आता  विदर्भवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज नागपूरच्या (Nagpur)संविधान चौकात विदर्भवाद्यांनी एकत्र येत रस्ता अडवून धरला. त्यामुळे बराच वेळ या ठिकाणी  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 27 डिसेंबरपासून यांच संविधान चौकात विदर्भवाद्यांनी आमरण उपोषण केले होते. दरम्यान अनेक वृद्ध उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. या उपोषणाच्या माध्यमातून विदर्भवाद्यांनी सरकारला 31 डिसेंबर पर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर गनिमीकावा केला जाईल, असा इशारा देखील विदर्भवाद्यांनी सरकारला दिला. त्यांच अनुषंगाने आज नव वर्षांच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र केल्याचे चित्र आहे. 


संविधान चौकात विदर्भवाद्यांनी अडवून धरला रस्ता


गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या  मागणीने आता अधिक जोर धरला आहे. उपराजधानी नागपूरसह विदर्भातील अनेक भागत विदर्भवाद्यांनी  एल्गार पुकारत आंदोलन केले जात असल्याचे चित्र आहे. त्याचं पार्श्वभूमीवर सरकारला 31 डिसेंबर पर्यंत दिलेल्या अल्टीमेटम नंतर विदर्भवाद्यांनी आज वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीने आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त केले. आज नागपूरच्या संविधान चौकात विदर्भावादी एकत्र येत बराच वेळ रास्ता अडवून धरला. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होऊन तानावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलीस आंदोलन स्थळी दाखल होऊन या आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिति नियंत्रणात आणली. यावेळी विदर्भवाद्यांनी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. आमच्या मागण्यापूर्ण होईपर्यंत हे आंदोलन असेच तीव्ररूप धारण करेल असा इशारा देखील देण्यात आला. 


31 डिसेंबर पर्यंत दिले होते सरकारला अल्टीमेटम


मुबलक नैसर्गिक साधन सुविधां असूनही केवळ राज्यकर्त्यांच्या स्वार्थापोटी विदर्भाची वाताहत सुरू आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, नक्षलवादामुळे विदर्भ ओसाड झाला आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाई संदर्भात नागपूरात माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भवाद्यांनी मागील 27 डिसेंबर पासून संविधान चौकात आमरण उपोषण केले होते. या उपोषण दरम्यान चार उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृद्ध विदर्भवादी कार्यकर्ते गेले चारहून अधिक दिवस आंदोलन करत असतांना देखील सरकारने आंदोलनाची दखल घेतलेली नाही, असा विदर्भवाद्यांचा आरोप होता. त्यांच वेळी विदर्भवाद्यांनी सरकारला  31 डिसेंबर पर्यंत उपोषणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन करू आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून गनिमीकावा करू, असा इशारा देखील विदर्भवाद्यांनी सरकारला दिला होता. सरकारने या अल्टीमेटमची दखल न घेतल्याने आता वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीने उग्र रूप प्राप्त केले असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: