नागपूर : मेजर ज्ञानचंद यांचे स्मृती प्रित्यर्थ तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या क्रीडा दिनानिमित्त हॅन्डबॉल (पुरुष गट), फुटबॉल (12 वर्षाखालील बालगट), हॉकी (17 वर्षाखील मुले) व मैदानी (12 वर्षाखालील बालगट) अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हॅन्डबॉल, फुटबॉल व मैदानी स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे तर हॉकी स्पर्धा पत्रकार निवासा जवळील विदर्भ हॉकी संघटनेच्या क्रीडांगणात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता पासून सुरु होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज 26 ऑगस्ट 2022 पर्यंत सकाळी 6.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे सादर करावे. जिल्ह्यातील सबंधिम खेळाचा संघ, खेळाडू विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.
ST Smart Card : एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला आणखी दोन महिने मुदतवाढ
क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंची ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड
नागपूर : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ॲथेलेटिक्स स्पर्धेत नयन सरडे याने 18 वर्षाखालील मुलांची 110 हर्डल स्पर्धा 14.64 सेकंदात पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला तर प्रेम धनरे व राहुल कुमार यांनी अनुक्रमे 300 व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिडिल रिलेमध्ये संघाला द्वितीय स्थान मिळवून दिले. रायपूर येथे 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या 33 व्या ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नयन सरडे याची निवड झाली आहे. नागपूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य शेखर पाटील, नागपूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा ॲथेलेटिक असोसिएशनचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. हे तीनही खेळाडू क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी स्पोर्ट्स होस्टेलचे असून क्रीडा प्रबोधिनी नागपूरच्या क्रीडा मार्गदर्शिका अरुणा गंधे व क्रीडा प्रबोधिनीचे माजी खेळाडू गजानन ठाकरे, शमशेर खान त्यांचे मार्गदर्शक आहेत.
Olympiad Exam : ऑलिम्पियाड परीक्षा 15 सप्टेंबर पासून, नागपुरातील एक लाखांवर विद्यार्थी होणार सहभागी