यावेळी आठवले यांनी वंचित आणि एमआयएमची युती तुटल्याबद्दलही भाष्य केले. आठवले म्हणाले की, "वंचितसोबतची युती तोडण्याचा एमआयएमचा निर्णय योग्य आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत राहून एमआयएमला काहीही फायदा होत नव्हता. उलट वंचितला एमआयएमचा फायदा होत होता"
दरम्यान, "एमआयएम जरी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली असली तरी आम्ही महायुतीतून बाहेर पडणार नाही", असेही आठवले मिश्कीलपणे म्हणाले. आठवले म्हणाले की, "एमआयएमचा एकमेव खासदारही एमआयएमच्या चिन्हावर निवडणून आला आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कोणतेही योगदान नाही"
आठवले म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असले, तरी वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता होईल, तरी मला असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फारशी मतं मिळणार नाहीत"
रामदास आठवलेंची बिर्लांच्या स्वागतासाठी गंमतीदार कविता | ABP Majha
उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर बनू शकत नाही : रामदास आठवले | ABP Majha