गणेशोत्सवानंतर आचारसहिंता,15 ऑक्टोबरदरम्यान विधानसभेसाठी मतदान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2019 09:04 PM (IST)
014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि आचारसंहिता 12 सप्टेंबर रोजी लागली होती. तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती.
मुंबई : राज्यात गणपती उत्सवानंतर आचारसंहिता लागू होईल आणि 15 ऑक्टोबरच्या जवळपास विधानसभा निवडणूक होईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे घेतील, असंही मुनगंटीवार म्हणाले. 288 जागांवर भाजपचे निरीक्षक गेले आहे. निरीक्षक उमेदवार जिकण्याच्या संभावनांची चाचपणी करत आहेत. कोणती जागा शिवसेनेला देता येईल याचा देखील निरीक्षक अभ्यास करत आहेत. पण युतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शहा घेणार आहेत, त्यामुळे यावर मी भाष्य करणार नाही. युतीचा फॉर्म्युला काही मीडियाच्या चर्चेत ठरणार नसल्यांचही मुनगंटीवार म्हणाले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी युतीचा फॉर्म्युला या आधीचं तयार असल्याचं म्हटलं होतं. VIDEO | राज्यात गणपती उत्सवानंतर आचारसंहिता, 15 ऑक्टोबरदरम्यान मतदान : सुधीर मुनगंटीवार | ABP Majha यापूर्वीचं गणेशोत्सवानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याच्या चर्चा होत्या. आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानानंतर या चर्चांना बळ मिळणार आहे. गणेशोत्सवानंतर अर्थात 12 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीनंतर विधानसभेच्या तारखा जाहीर होऊ शकतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि आचारसंहिता 12 सप्टेंबर रोजी लागली होती. तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. यावेळीही मतदान आणि मतमोजणीची तारीख त्याच्या जवळपासच असण्याची शक्यता आहे. VIDEO | शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंच्या पक्षाचं विलिनीकरण होणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस | ABP Majha