नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या काल (गुरुवार, 04 एप्रिल) नागपूरमध्ये झालेल्या सभेला गर्दी नव्हतीच. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने प्रसारित केले. या वृत्तानंतर काँग्रेस नेत्यांनी गर्दीचे फोटो ट्वीट केले आणि त्यासोबत राहुल गांधीच्या नागपूरमधील सभेचे फोटो असल्याचे कॅप्शन लिहिले. परंतु हे फोटो खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे.


काँग्रेसच्या नेत्यांनी ट्वीट केलेली छायाचित्रं तब्बल तीन वर्षे जुनी असल्याचे उघडकीस झाले आहे. ती छायाचित्रे 11 एप्रिल 2016 रोजी कस्तुरचंद पार्कमधील सभेची आहेत. 'एबीपी माझा'ने केलेल्या व्हायरल टेस्टमध्ये हे उगड झाले आहे.

काल राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हती. याची बातमी माझाने प्रसारित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तीन वर्षे जुने गर्दीचे फोटो ट्वीट करत एबीपी माझाला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस नेत्यांचा खोटेपणा आता उघड झाला आहे.

काल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींच्या नागपूरमधील सभेनंतर हे छायाचित्र ट्विट केले आणि सवाल विचारला "एक लाख लोक पुरेसे नाहीत का? नागपुरात पाऊस पडूनही एवढी गर्दी!" त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्याही पुढे जाऊन ट्वीट केले. त्यांनी सत्यजित तांबे यांच्या ट्वीटला रिट्वीट करत, "राहुल गांधींच्या सभेला तुरळक गर्दी होती ही बातमी खोडसाळ आहे. वस्तुस्थिती या फोटोमध्ये दिसून येईल." असे म्हटले.



नागपूर टुडे या वेबसाइटवरील ही बातमी पाहा. तारीख 11 एप्रिल 2016. बातमी आहे काँग्रेसच्या संविधान रॅलीची. हेच फोटो काल काँग्रेसच्या नेत्यांनी पोस्ट केले होते.



11 एप्रिल 2016 नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये काँग्रेसची एक सभा आयोजित केली होती. सोनिया गांधींच्या जोडीनं राहुल गांधीही या सभेला उपस्थित होते. काँग्रेसच्या अतिउत्साही नेत्यांना याच सभेचे छायाचित्र मिळाले. हेच छायाचित्र वापरुन काँग्रेस नेत्यांनी एबीपी माझाला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्या छायाचित्रावरील नागपूर टुडेच्या वॉटर मार्कने त्यांचा खोटेपणा उघडा पाडला आहे.






व्हिडीओ पाहा



सभेचा खरा फोटो