नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या (eco friendly ganesha) अनुषंगाने नागपूर शहरातील तलावात मूर्ती विसर्जनास बंदी असली तरी मनपाद्वारे चार फुटांवरील मूर्तींच्या विसर्जनासाठी (ganesh idol immersion) व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोराडी (Koradi) येथील तलाव परिसरात असलेल्या मोठ्या कृत्रिम विसर्जन (artificial immersion tank) कुंडामध्ये मनपाद्वारे विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या विसर्जनस्थळाची जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी पाहणी केली.
यावेळी पोलिस अधीक्षक विजय मगर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक व उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यात आलेला आहे. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व तलावांमध्ये मूर्ती विजर्सनास बंदी करण्यात आली आहे. 4 फुटापर्यंतच्या उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी मनपाद्वारे शहरातील विविध भागात कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूरात 387 विसर्जन कुंड
शहरात प्रभागनिहाय एकूण 387 विसर्जन कुंडांची व्यवस्था मनपाद्वारे (NMC) करण्यात आलेली आहे. मात्र या कुंडांमध्ये केवळ 4 फुटापर्यंतच्याच मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. चार फूटापेक्षा मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी आता मनपाद्वारे कोराडी तलाव (Koradi Lake) परिसरात असलेल्या मोठ्या सिमेंटच्या हौदामध्ये (cement tank) विसर्जनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी क्रेन आणि बॅरीकेडसची व्यवस्था मनपातर्फे करण्याचे निर्देश डॉ. इटणकर यांनी दिले. विसर्जनस्थळाची पाहणी करून मनपा आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले. यासाठी मनपाद्वारे आवश्यक ती व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले आहे.
मनपात ५ सप्टेंबर रोजी लोकशाही दिन
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या 30 डिसेंबर 1999 च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार 'लोकशाही दिन' म्हणून आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार 5 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या