Nagpur News : नवीन वर्षाचा प्रारंभ नागपूरकरांसाठी दोन मोठ्या आयोजनाने होत आहे. अगदी प्रारंभी इंडियन सायन्स कॉंग्रेस (Indian Science Congress) होत असून, लागलीच 20 ते 23 जानेवारीपर्यंत तीन दिवसीय इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेस (आयपीसी) होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (RTMNU) 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेसचे (indian pharmaceutical congress 2023) यजमानपद मिळाले आहे.
 
विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाच्या (Department of Pharmaceutical Sciences) वतीने इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनतर्फे (Indian Hospital Pharmacist Association) विद्यापीठ कॅम्पस परिसरात आयपीसी पार पडेल. तीन दिवसीय या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्र होतील. तसेच फार्मासंदर्भातील संकल्पना 'गुणवत्तापूर्ण आणि सुगम औषधीय उत्पादन' यावर परिषदही होईल. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, ऑटोमेशन इन फार्मा इंडस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉर्मा कोव्हिजिलन्स, फॉर्माकोजिनोमिक्स यासारख्या औषधीय तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल देखील फार्मा एक्स्पोच्या माध्यमातून परिषदेदरम्यान असेल. इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेसच्या आयोजनासाठी अतुल मंडलेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे.


1948 मध्ये कोलकात्यात पहिली कॉंग्रेस


1939 मध्ये इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनची (आयपीए) स्थापना करण्यात आली. तर, डिसेंबर, 1948 मध्ये कोलकाता येथे पहिल्या इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. आयपीए स्थापन करणारे प्रा. एम.एल.श्रॉफ यांनीच पहिल्या फार्मास्युटिकल कॉंग्रेसची अध्यक्षता केली होती.


जावेद अली, नितीन मुकेश नाईट


या कॉंग्रेसमध्ये येणाऱ्यां पाहुण्यांसाठी आणि इतरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असेल. प्रसिद्ध गायक जावेद अली यांची नाईट पहिल्याच दिवशी 20 जानेवारीला तर, दुसऱ्या दिवशी 21 जानेवारीला ज्येष्ठ गायक नितीन मुकेश यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. यासोबत या कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेल्या देशभरातील प्रतिनिधींसाठी शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ झालेल्या फुटाळ्यात फाऊंटेन शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.


'इंडियन सायन्स काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन


नागपुरात 1974 नंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात आले आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (Nagpur University) मिळाले आहे. 3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात आयोजित या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. दरवर्षी भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (Indian Science Congress) या परिषदेचे आयोजन केले जाते. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, अशा 14 विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध, भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ञांचा सहभाग, अशी विज्ञानाला समर्पित व्यापकता या संमेलनाची असते.


ही बातमी देखील वाचा


समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी 'नॉनस्टॉप' बस सेवा उद्यापासून; जाणून घ्या तिकीट दर अन् वेळापत्रक


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI