नागपूर: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे चाणक्य नाहीत, त्यांनी आतापर्यंत कोणता नेता घडवला? त्यांच्या अवतीभोवती दुसऱ्या पक्षातून भाड्याने घेतलेली मंडळी असतात अशी घणाघाती टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. फडणवीसांनी एक नव्हे तर दोन दोन पक्ष फोडले, तरीही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, 2024 मध्येही ते मुख्यमंत्री होणार नाहीत असंही सुषमी अंधारे म्हणाल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसरा टप्प्याची आज नागपुरातून सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. 


नागपूर पुराच्या वेळी अमृता वहिणी कुठे होत्या? 


आम्हाला बुडा खाली जाळ लावायला आवडते म्हणून महप्रबोधन यात्रेच्या पहिल्या पर्वाची सुरुवात आम्ही ठाण्यातील टेंभी नाक्यातून केली होती. आता दुसऱ्या पर्वाची सुरुवात आम्ही नागपुरातून करत आहे. काही लोकं म्हणतात फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात करत आहे.  मागे पुरात फडणवीस यांच्या बालेकिल्ल्याचे तीन तेरा वाजले. मुंबईच्या पुराच्या वेळेला फोटो काढणाऱ्या अमृता वहिनी नागपूरच्या पुराच्या वेळेला दिसल्या नाहीत. 2014 च्या शपथविधीच्या वेळेच्या अमृता वहिनी पाहा आणि आजच्या अमृतावहिनी पाहा, मग विकास कोणाचा झाला हे कळेल. 


आताची भाजप भाड्याने जमवलेली 


सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवा ( फडणवीस ) भाऊ फार हुशार आहे असे म्हणतात. ते चाणक्य आहे असे म्हणतात. मात्र, मला त्यांच्यात विशेष दिसले. शरद पवार यांनी अनेक नेते घडविले. बाळासाहेब ठाकरे यांनी ही अनेक नेते घडवले. फडणवीस यांनी कोणाला घडवले असे विचार केल्यावर मला लक्षात आले की त्यांनी कोणालाच घडविले नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले सर्व नेते दुसऱ्या पक्षातून आणलेले नेते आहे. आजची भाजप भाड्याने जमवलेली भाजप आहे.


फडणवीस तुम्ही चाणक्य नाही. फडणवीस तुमच्या अवतीभवती असलेली राणे, सदावर्ते, कंबोज, नवनीत राणा ही नेते मंडळी नाहीत... ही सर्व भूंकणारी XX आहेत. श्रीराम सत्यवचनी होते आणि फडणवीस राष्ट्रवादी सोबत युती नाही म्हणत म्हणत युती केली. 


देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना महाराष्ट्र अशांत ठेवतात, त्यासाठी विशेष टीम कामाला लावतात असं सांगत सुषमा अंधारे म्हणाल्या की, जनतेला निवडणुकीत फडणवीस यांना प्रश्न विचारावे लागेल. ज्यावर तुम्ही आरोप केले, ते आज तुमच्या सोबत सत्तेत आहेत. फडणवीस यांना कोणी प्रश्न विचारले तर ते धमकी देतात. मी ड्रग्जबद्दल प्रश्न विचारले तर मला तोंड बंद करण्याची धमकी दिली. महाराष्ट्रात कोणी प्रश्न विचारायचे नाही असे त्यांचे  धोरण आहे.


ही बातमी वाचा: