नागपूर : 900 होमगार्डपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात अचानक रद्द करण्यात आली आहे. याविरोधात नागपुरात शेकडो तरुण-तरुणींनी सरकारविरोधात जोरदार रोष व्यक्त केला. आंदोलकांनी सरकार आणि गृहविभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणाबाजी केली.
निवड प्रक्रियेत तांत्रिक चुका आणि अनियमितता झाल्याचं सांगत 900 पदांसाठीची प्रक्रिया गुणवत्ता यादी लावल्यानंतर रद्द करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या अनियमितता, तांत्रिक चुकांची शिक्षा आम्हाला का? असा सवाल गुणवत्ता यादीतील तरुण-तरुणींनी विचारला आहे. तसंच सरकार आणि गृह विभागाच्या कारभाराविरोधात घोषणा दिल्या.
दरम्यान, काँग्रेसने उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
900 होमगार्डपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द, उमेदवारांचा सरकारविरोधात रोष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2019 03:34 PM (IST)
अधिकाऱ्यांनी केलेल्या अनियमितता, तांत्रिक चुकांची शिक्षा आम्हाला का? असा सवाल गुणवत्ता यादीतील तरुण-तरुणींनी विचारला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -