नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नवे शैक्षणिक धोरण राबविण्याची तयारी संपूर्ण देशभर करण्यात आली आहे. यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. याच मालिकेत आता शालेय अभ्यासक्रमात भारतीय सैनिकांच्या शौर्याचा समावेश करण्यात येणार आहे. यामागे विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती जबाबदारीची भावना निर्माण होईल. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी सशस्त्र दलांशी सल्लामसलत केली जाणार आहे. यासोबतच अभ्यासक्रमात शौर्यपूर्ण कार्य आणि सशस्त्र दलांच्या बलिदानाच्या कथांचा समावेश केला जाणार आहे.


मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू झाल्या नसल्याने नवे शैक्षणिक धोरण राबविण्यात सरकारांना अडचणी आल्या होत्या. कोरोना नियंत्रणात आल्यावर यावर्षी शाळा सुरू झाल्या असून पुढील वर्षीपासून नवा अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. अभ्यासक्रमात बदल व सैनिकांच्या शौर्याचा समावेश करण्याचे सुतवाव नुकतेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व सैन्यदलातील अधिकाऱ्यांची उपस्थित असल्याने लवकरच अशा प्रकारचा समावेश केला जाण्याची शक्यता बळावली आहे.


Tatkal Railway Reservation : रेल्वेच्या तत्काळ कोट्याला उच्च न्यायालयात आव्हान, रेल्वे मंत्रालयाला उत्तर दाखल करण्याचे आदेश


म्हणून केला जातोय प्रयत्न


21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत वीरगाथा प्रकल्प राबवून स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात 8,00,000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना निबंध, कविता, रेखाचित्रे आणि मल्टिमीडिया सादरीकरणाच्या माध्यमातून शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावरील प्रेरणादायी कथा सामायिक करण्यास प्रोत्साहित करण्यात आले होते. भविष्यात या स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक होणार असून 1 कोटी विद्यार्थी सहभागी व्हावेत असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात सैनिकांचा गाथांचा समावेश करण्यात येणार आहे.


Nagpur Crime : सांगलीच्या व्यावसायिकाकडून नागपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण, पोलिसांच्या मदतीने सुटका


सैन्याचा पराक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट 


महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील अभ्यासक्रमात आधीपासूनच स्वातंत्र्याप्राप्तीनंतर झालेल्या युद्धतील वीर जवानांच्या गाथांचा समावेश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. परमवीर चक्र, अशोक चक्र यासह युद्धात असाधारण कामगिरी करणाऱ्याच्या कथा विद्यार्थ्यांना शिकवून प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे अभ्यासक्रमात बदल होईल असे मानता येणार नाही. मात्र त्यात नव्या काही युद्धांचा समावेश केला जाऊ शकतो असे मत व्यक्त केले.


Kanhaiya Kumar : "एखाद्या दिवशी नितीन गडकरींच्या विरोधातच सीबीआयचा वापर होऊ नये"