नागपूरः भारतीय रेल्वेतर्फे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ कोट्यातून तिकीट विक्री करताना जादा दर वसूल केले जातात. या योजनेला नागपुरातील अजय माहेश्वरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करीत आव्हान दिले आहे. न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला यावर चार आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
जादा दराने विक्री कायद्याबाहेर
याप्रकरणी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, तत्काळ आणइ प्रीमियम तत्काळ तिकीटाचे दराचे उदाहरण पाहिल्यास नागपूर ते वर्धा तिकीटाचे दर 205 रुपये आहे. हेच तत्काळ कोट्यातून 425 आणि प्रीमियम तत्काळ कोट्यातून तिकीट काढल्यास 980 रुपये आकारले जाते. अशा जादा दरामध्ये विक्री करताना कायद्याचे पालन होत नाही, असा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
काळाबाजारी बंद करण्याच्या उद्देशाला हरताळ
1998-1999 सालच्या रेल्वे अर्थसंकल्पादरम्यान तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी आणि 2014 साली रेल्वेतर्फे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्येुसद्धा याचा उल्लेख केला होता. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांपासून वाचविण्याचासुद्धा उद्देश या योजने मागे होता, असाही उल्लेख याचिकेत केला आहे. मात्र, अशा गरजू प्रवाशांना तिकीट विक्री करण्यात येत नसून या कोट्यातून तिकीट खरेदी करणाऱ्यांचा प्रवास पूर्वनियोजित असतो. रेल्वेतर्फे तीस टक्के आसान या कोट्यासाठी राखीव ठेवले जाते. त्यामुळे प्रवाशांना जादा दरामध्ये तिकीट खरेदी करावे लागते. याचिकाकर्त्यांतर्फे अजय माहेश्वरी यांनी स्वतः बाजू मांडली.
Nagpur Crime : काही दिवसांपूर्वीपर्यंत घट्ट मैत्री, मात्र मित्रानेच केला तिचा घात
मध्ये रेल्वेच्या 14 गाड्या पुन्हा रद्द
नागपूरः वर्धा येथे मध्य रेल्वेचे नॉन-इंटरलॉकिंग काम सुरू आहे. या कामामुळे 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान एक्स्प्रेस व मेमू अशा एकूण 14 गाड्या रद्ध करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागातील वर्धा-चिटोडा सेक्शनदरम्यान दुसऱ्या कॉर्ड लाइनची दुरुस्ती आणि वर्धा यार्डमध्ये संशोधक व सिग्नलिंग परिवर्तन कार्यासाठी हे ब्लॉक घेण्यात आले आहे. त्यामुळे गाडी क्रमांक 01315/01316 वर्धा-बल्लारशाह-वर्धा मेमू, 01371/ 01372 अमरावती-वर्धा-अमरावती मेमू, 01373 वर्धा-नागपूर मेमू या गाड्या 21 ऑगस्टम्हणजे उद्यापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, 11403 नागपूर कोल्हापूर एक्स्प्रेस व 12119 अमरावती-अजनी एक्स्प्रेस आज म्हणजेच 20 ऑगस्टला आणि 22152 काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस 21 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे. अचानक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे गैरसोय होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.