Government Medical College Nagpur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) GMC उपचारानंतर काही प्रमाणात बरे झालेल्या रुग्णांना मेडिकलच्या विविध वॉर्डामध्ये हलवण्यात येते. रुग्णांना मेडिकलमध्ये (Government Medical College) पोहचवत असताना रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे अपघाताची भीती आहे. ही बाब लक्षात घेत ट्रॉमा विभागापासून तर आपत्कालिन विभागापर्यंत स्काय वॉक तयार करण्यात येणार होता. पण हा प्रस्ताव रखडला होता. नुकतेच स्काय वॉकसह, पेईंग वॉर्ड, मुलींचे वसतिगृह आणि सुरक्षा भिंत तयार करण्यासाठी 120 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. व्हाईट बुकमध्ये तशी तरतूद करण्यात आली, हे विशेष.


उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह इतरही सरकारी रुग्णालयांचे आगामी काळात श्रेणीवर्धन करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. मेडिकलच्या श्रेणीवर्धनासाठी पहिल्या टप्प्यात पुरवणी मागण्यांमध्ये 120 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मेडिकलमध्ये दरवर्षी 250 विद्यार्थ्यांचा एमबीबीएस पदवीसाठी प्रवेश होता. याशिवाय इंटर्न विद्यार्थी असतात. अशी एकूण 1200 विद्यार्थी संख्या असते. यातील पन्नास टक्के मुलीं असतात. एकूण विद्यार्थ्यांच्या 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांना वसतिगृह कमी पडत असल्यामुळे बाहेर राहावे लागते. ही बाब लक्षात घेत विद्यमान अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 120 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. यात मुलींसाठी 450 खोल्यांचे वसतिगृह, 80 खाटांचा पेईंग वॉर्ड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली आहे. 


प्रकल्पात मंजूर कामांची यादी....


■ मुलींसाठी 450 खोल्यांचे वसतिगृह - 62.84 कोटी


■ पेईंग वॉर्ड 80 खाटांचा -45.06 कोटी


■ स्काय वॉक (ट्रॉमा ते कॅज्युअल्टी) - 5.०० कोटी


■ सुरक्षा भिंत (250 एकरासाठी) 9.18 कोटी


मृतदेहाची विटंबना थांबणार


मेडिकलचा सर्जरी विभाग किंवा ट्रॉमा केअर युनिटमध्ये एखाद्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरून स्ट्रेचरवर मृतदेह शवविच्छेदन विभागात नेण्यात येतो. हे दृश्य अतिशय भयावह असते. अनेकदा एका कर्मचाऱ्याऐवजी दोन कर्मचाऱ्यांना शवविच्छेदन विभागात जावे लागते. यासाठी देखील हा स्काय वॉक वरदान ठरणार होता. प्रशासनाने बातमीची दखल घेऊन स्काय वॉकचा समावेश केला. हा स्काय वॉक तयार झाल्यानंतर मृतदेहाची विटंबना थांबेल.


ही बातमी देखील वाचा...


Teachers Constituency Elections : उमेदवारी अर्ज छाननी परीक्षेत सर्व 27 'शिक्षक' उमेदवार पास; नागपूर विभागात सोमवारी चित्र स्पष्ट होणार