Shyam Manav Nagpur News : अनेकवेळा पाश्चिमात्य देशांतील स्वयंसेवी संस्थांकडून पैशाच्या ऑफर आल्या, मात्र गेल्या 40 वर्षांत कधीही पाश्चात्य देशांच्या पैशातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम झाले नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम चालवण्यासाठी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे वापरल्याचा दावाही श्याम मानव यांनी केला. धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावर आरोप केल्यानंतर श्याम मानव हे ख्रिस्ती धर्माचे असून त्यांना हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी विदेशातून पैसा मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


श्रीलंकेचे अब्राहम ओउर माझे गुरू आहेत. पण माझे गुरु ख्रिश्चन आहेत म्हणून मी ख्रिश्चन आहे असे म्हणणे योग्य नाही. हिंदूंनी कॅमेरा, माइक, मोबाईल फोन आणि इतर यांत्रिक वस्तू बनवल्या आहेत का? विज्ञानाने बनवलेल्या बहुतेक गोष्टी ख्रिश्चनांनी बनवल्या आहेत, मग विज्ञान ख्रिश्चनांचे आहे का? श्याम मानव यांचे शिक्षक ख्रिश्चन आहेत का, या प्रश्नावर श्याम मानव यांनी हे अजब उत्तर दिले. अब्राहम ओउर यांच्याशिवाय विनोबा भावे, दादा धर्माधिकारी, जयप्रकाश नारायण आणि संघाचे मा गो वैद्य हेही माझे शिक्षक राहिले आहेत. अशा परिस्थितीत माझ्या गुरूंच्या धर्माच्या आधारे माझा धर्म ठरवणे योग्य नाही, असे श्याम मानव म्हणाले.


एवढेच नव्हे तर समितीचे जनजागृतीचे कार्य चालविण्यासाठी शासनाची मदत कधीच घेण्यात आली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खाते सर्वांसाठी उपलब्ध आहे, ज्यांना शंका असेल ते येऊन पाहू शकतात, असेही श्याम मानव म्हणाले. आजपर्यंत आपण कधीच देवाविरुद्ध, धर्माविरुद्ध काहीही बोललो नाही, मात्र धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात आम्ही काम करतो, असा दावा श्याम मानव यांनी केला.


अंनिसचे श्याम मानव यांच्यावर हिंदूंना बदनाम करण्यासाठी सभा घेतल्याचा आरोप 


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात गोंधळ झाला होता. श्याम मानव फक्त हिंदू धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करत आहेत. आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांनी कुठेही धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला असा आरोप करत काही तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रमात गोंधळ घातला.  श्याम मानव यांची सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहून घोषणाबाजी केली होती.


ही बातमी देखील वाचा...


नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा, कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक