नागपूर: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने राज्यासह देश हादरला होता. असातच आता  नागपुरात (Nagpur News) आलिशान ऑडी (Audi Car) गाडीनं दुचाकीला धडक दिली आहे. ज्या भरधाव ऑडीनं अपघात (Nagpur Audi Accident) झाला ती, ऑडी कार एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची ती कार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ऑडीनं अपघात झाला ती ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे यांची असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस संबधित घटनेचा तपास करत आहेत, या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी हल्लाबोल केला आहे, त्याचबरोबर केसमधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. 


सुषमा अंधारे यांनी नागपूर  हिट अँड रन प्रकरण केसमधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सुरक्षितता अतिमहत्त्वाची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते. त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवेत, असं देखील अंधारेंनी म्हटलं आहे.




अपघातावेळी संकेत बावनकुळे ऑडी गाडीतच : सुषमा अंधारे 


त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी या अपघातानंतर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अपघातावेळी भरधाव आलिशान ऑडी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. 


सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांवर रॅश ड्रयव्हिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना, हा अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, अपघात घडवणारी ऑडी कार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती मिळत आहे. 


संकेत बावनकुळेनं ज्या बारमध्ये मद्यपान केलं... : सुषमा अंधारे 


सुषमा अंधारे यांनी "संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते, त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवेत."


 या प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "या अपघातातील गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये. किंबहुना, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. परमेश्वराच्या कृपेने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. तर या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तसेच याबद्दल मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांशी आतापर्यंत बोललेलो नाही."