नागपूरः आयुष्यात येणाऱ्या समस्यांसोबत दोन-दोन हात करताना कधी यश तर कधी अपयश येत असतो. मात्र अपयशामुळे आलेल्या नैराश्यातून सावरण्यास क्षणही विलंब झाल्यास घेतलेल्या निर्णयाची किंमत कुटुंबियांना मोजावी लागते. अशीच घटना नागपूरातील एसएफएस महाविद्यालयात शुक्रवारी घडली.


बीसीसीएच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिवम कटरे याने आपली परीक्षा संपताच वर्गाबाहेरील गॅलरीमधून उडी मारली. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांने उडी मारण्यापूर्वी पेट्रोल पिले होते. तसेच एका मित्राला शेवटचा फोनही लावला होता. मात्र मित्राने प्रतिसाद दिला नाही. अन् काही बोलण्यापूर्वीच त्याने जीवनयात्रा संपविण्याचे निर्णय घेतले.


दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घडना घडली. खाली मैदानात कोसळ्यानंतर तब्बल पंधरा मिनिटे शिवम तसाच पडून होता आणि त्याचे मित्र रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कार आहे का कोणाकडे अशी विचारणा करत होते. नंतर विद्यार्थी आणि काही शिक्षकांनी शिवमला मानकापूर येथील अॅलेक्सीस रुग्णालयात भरती केले. दुपारी 3 पर्यंत शिवम त्याच्या कुटुंबियांसोबत बोलला. त्यावेळी त्याने आपल्या वडीलांना सांगितलेले शेवटचे 'शब्द पापा मुझे माफ करो, आपने मेरे लिए बोहोत किया है, अब मुझे जीना नही है' होते अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. या घटनेनंतर रुग्णालयात मोठ्यासंख्येत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ता धडले. यानंतर सायंकाळी 7.30च्या सुमारास महाविद्यालयाचे प्राचार्य आल्याची माहिती आहे. आपल्या महाविद्यालयात ही घडना घडल्याने प्राचार्यांनी तत्काळ पोहोचून माहिती घेणे अपेक्षित असताना त्यांनी रुग्णालयात पोहोचण्यास एवढा विलंब केल्याने विद्यार्थी आणि नागरिकांनी रोष व्यक्त केला.


प्राप्त माहितीनुसार मुलाचे वडील इलेक्ट्रीक फिटिंगची कामे करतात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालय गाठून विद्यार्थ्याच्या खास मित्रांसोबत विचारपूस सुरु करुन आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेनंतर तत्काळ उपचार मिळाला असता तर विद्यार्थ्याचा जीव वाचू शकला असता अशी प्रतिक्रीया आम आदमी पार्टीचे प्रभात अग्रवाल यांनी दिली.


Chandrashekhar Bawankule : ऑटोचालक, झेडपी सदस्य, आमदार ते ऊर्जामंत्री, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष


जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षेचे गुणपत्रक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध


नागपूर: सहकार खात्यामार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा निकाल जाहीर झालेला आहे. या परीक्षेत नागपूर केंद्रावरील उत्तीर्ण व अनुतीर्ण झालेल्या परीक्षार्थीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भूविकास बँक कॉम्प्लेक्स, गणेशपेठ, नागपूर या कार्यालयात 1 ते 30 ऑगस्ट या कालावधीत काया्रलयीन वेळेत वाटप करण्यात येणार आहे.
उत्तीर्ण व अनुत्तीर्ण परीक्षार्थींनी गुणपत्रक व प्रमाणपत्र  कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था गौतम वालदे यांनी कळविले आहे.