नागपूर : भाजप नेत्या (BJP Leader) सना खान (Sana Khan Case Update) हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता आहे.
सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट!
सना खान यांचा मृतदेह सापडल्याचा दावा पोलिसांच्या सुत्रांकडून व्यक्त केला जात आहे. सना खान यांच्या पतीने त्यांची हत्या केल्याचं समोर आलं पण, पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. दरम्यान, आता मध्य प्रदेशात सापडलेला महिलेचा मृतदेह सना खान यांचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह सना खान यांचा असण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात सापडला भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह
मृतदेहावरील कपडे सना खान यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखे दिसत असल्यामुळे तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित मृतदेह सना खान यांचा आहे, हे अजून स्पष्ट झालेले नसल्याची नागपूर पोलीस दलातील सूत्रांची माहिती आहे. नागपूर पोलिसांचं एक पथक सध्या घटनास्थळी रवाना झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या विहिरीत महिलेचे मृतदेह मिळाला आहे, ती विहीर जबलपूरपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे.
पतीने हत्या करून मृतदेह जबलपूरच्या नदीत फेकला
दरम्यान, सना खान यांचा पती अमित साहू यानं हत्येची कबूली दिली, त्यावेळ हत्या कडून मृतदेह नदीत फेकल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता नदीत सापडलेला मृतहेद सना खान यांचा असल्याचं स्पष्ट झाल्यास अमित साहू पोलीस तपासात खोटं बोलून दिशाभूल करत असल्याचं स्पष्ट होईल. तपासानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येईल.
Sana Khan Murder Case : नेमकं काय आहे प्रकरण?
भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकारी सना खान 1 ऑगस्टला अमित शाहूला भेटायला जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी अमित साहूसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण झालं. त्यानंतर सना त्याच रात्री तातडीने अखेरच्या बसने जबलपूरला गेल्या, मात्र तेथून परतल्या नाही. अमित साहू (Amit Sahu) हा जबलपूरमधील एक हॉटेल व्यावसायिक आहे. नंतर सना खान आणि अमित साहू पती-पत्नी असल्याचं समोर आलं.