Mohan Bhagwat On Reservation: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) चे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आरक्षणावर केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बुधवारी (6 सप्टेंबर) रोजी मोहन भागवत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "समाजात जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम हवं". नागपुरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


मोहन भागवत म्हणाले की, "सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण आपल्या बांधवांना मागे टाकलं आहे. आपण त्यांची काळजी घेतली नाही आणि 2000 वर्षांपर्यंत सुरू राहिलं. जोपर्यंत आपण त्यांना समानतेनं वागवत नाही, तोपर्यंत काही विशेष गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि त्यापैकीच एक आरक्षण आहे. त्यामुळेच जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम असायला हवं." कार्यक्रमात पुढे बोलताना ते म्हणाले की, "जोपर्यंत समाजात भेदभाव अस्तित्वात आहे. आम्ही संघवाले म्हणजेच आरएसएसचा संविधानात दिलेल्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. भेदभाव दिसत नसला तरी समाजात तो प्रचलित आहे.






एका विद्यार्थ्यानं, जेव्हा वंचित समाजातील व्यक्ती राष्ट्रपती झाली. देशाच्या, मग आरक्षणाची गरज काय? आज जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या आहेत, तर आरक्षण का रद्द केलं जात नाही? यावर बोलताना सरसंघचालक म्हणाले की, आपल्या देशात सामाजिक विषमतेचा इतिहास लक्षात घेऊन आरक्षण दिलं गेलं आहे. ज्यांनी भेदभाव केला. आमच्यासोबत राहिले, त्यांना मागे ठेवलं, त्यांचं आयुष्य जनावरांसारखं असूनही आपण काळजी केली नाही आणि हे असंच दोन हजार वर्षे चाललं. त्यामुळे त्यांना बरोबरीत आणेपर्यंत आरक्षणासारखे उपाय करणं आवश्यक आहे. 


संविधानानुसार जे आरक्षण आहे, त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा : मोहन भागवत 


मोहन भागवत पुढे म्हणाले की, संविधानानुसार जे आरक्षण आहे, त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. आज जरी भेदभाव दिसत नसले तरी भेदभाव अजूनही आहे. आरक्षणामुळे मोठ्या नोकऱ्या मिळत असल्या तरी भेदभाव अजूनही कायम आहे. हिंदू समाजात सर्वांसाठी मंदिर, पाणी, स्मशानभूमी... जमीन एक असली पाहिजे. अशी परिस्थिती संघाच्या शाखा आणि इतर ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. संघप्रमुख म्हणाले की, आज ज्यांना आरक्षण मिळतं त्यातही काही लोक उभे राहून म्हणू लागले आहेत की, आरक्षणामुळे आम्ही सक्षम झालो आहोत, आता आम्हाला आरक्षणाची गरज नाही. म्हणून ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण द्या. अशा परिस्थितीत आम्हाला दोघांसाठी त्रास झाला तर दोन हजार वर्षांपासून आपल्या जनतेला शंभर वर्ष भोगावी लागली, मग काय फरक पडतो, असा सवाल संघप्रमुखांनी विद्यार्थ्यांना विचारला.


मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? 


आरएसएस के सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, हे केवळ आर्थिक किंवा राजकीय समानता सुनिश्चित करण्यासाठी नाही, तर सन्मान देण्यासाठी देखील आहे. ते म्हणाले की, भेदभावाचा सामना करणार्‍या समाजातील काही घटकांना 2000 वर्षे समस्यांचा सामना करावा लागला आहे, तर मग आम्ही (ज्यांनी भेदभावाचा सामना केलेला नाही) आणखी 200 वर्ष काही समस्यांना तोंड का देऊ शकत नाही?


दरम्यान, संविधानानुसार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना जातीच्या आधारावर भेदभावामुळे आरक्षण मिळतं. मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर इतर मागासवर्गीयांनाही (OBC) आरक्षण मिळणार आहे.