ABP Majha Impact : 'एबीपी माझा'च्या बातमीला देशातील सर्वोच्च राजकीय वर्तुळातही किती गांभीर्याने घेतले जाते याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे. 'एबीपी माझा'वर काँग्रेस नेतृत्वाने कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबाला दिलेले आश्वासन पाळले नसल्याबद्दलची बातमी चालताच अवघ्या काही तासात दिल्लीतील काँग्रेस कार्यालयातून पांडे कुटुंबाला फोन आला आणि राहुल गांधींनी (Rahul Gandhi)  तुम्हाला भेटायला बोलावले आहे असा निरोप देण्यात आला. त्यानंतर काँग्रेसकडून पांडे कुटुंबीयांना 25 लाख रुपयांचा चेकही देण्यात आला. 


भारत जोडो यात्रेदरम्यान कृष्णकुमार पांडेंचे निधन


भारत जोडो यात्रेदरम्यान 8 नोव्हेंबर 2022 रोजी राहुल गांधींसोबत पदयात्रा करताना नागपूरचे काँग्रेस कार्यकर्ते कृष्णकुमार पांडे यांचा निधन झालं होतं. तेव्हा भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या श्रद्धांजली सभेत राहुल गांधी यांनी पांडे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी लवकरच नागपुरात येईन असे म्हटले होते. तसेच काँग्रेस पक्षाने पांडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा शब्दही दिला होता.


कृष्णकुमार पांडे यांच्या निधनाला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या दोन्ही आश्वासनं पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे पांडे कुटुंबीयांनी एबीपी माझाच्या माध्यमातून आपलं म्हणणं काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.


25 लाखांची मदतही दिली


एबीपी माझाने कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं फक्त दाखवलंच नाही तर काँग्रेस आपल्या कार्यकर्त्याचा त्यागही विसरली का असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर लगेच राहुल गांधी यांनी नागपुरात दाखल होताच कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना फक्त भेटायलाच बोलावले नाही, तर त्यांची विचारपूसही केली. सोबतच काँग्रेस पक्षाकडून आर्थिक मदतीचा 25 लाख रुपयांचा चेकही पांडे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.


कृष्णकुमार पांडे कुटुंब सभा सभास्थानी जाऊन राहुल गांधी यांना भेटले. काही निवडक नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी पांडे कुटुंबायांची भेट घेतली. गेले एक वर्ष ते सांत्वन करायला का येऊ शकले नाही याची कारणं सांगितली. पांडे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली आणि त्यानंतर पांडे कुटुंबाला एका वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 25 लाखांचा धनादेश दिला.


पक्ष नेतृत्व पासून जी काही तक्रार होती ती आजच्या भेटीमुळे दूर झाल्याची भावना पांडे कुटुंबीयांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. बातमी देऊन आमची व्यथा सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद दिले आहे.


ही बातमी वाचा: