Nagpur Police News : पोलिसांच्या कारवाईत खबरींचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो. त्या आधारावर मोठमोठ्या कामगिरी अतिशय गुप्तपणे पार पाडल्या जातात. मात्र, एक दिवसांपूर्वी शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात बनावट सोने विरोधात कारवाई केली. मात्र, खबरीकडून आलेल्या चुकीच्या माहितीमुळे ही कारवाईच अडचणीत आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकावर नामुष्कीची वेळ आल्याची चर्चा पोलीस (Nagpur Police) वर्तुळात चांगलीच रंगली आहे.


चांदीवर चढवला सोन्याचा रंग


लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांधीबाग येथे असलेल्या दोन व्यापाऱ्यांना युनियन बँकेत मॉर्गेज एजन्ट असल्याचे सांगून त्यांना बँकमध्ये जप्त करण्यात आलेल्या प्रॉपर्टी कमी किमतीत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यातून दोन्ही व्यापाऱ्यांनी त्याला 40 आणि 30 लाख दिले. मात्र, त्यातून प्रॉपर्टी न मिळाल्याने त्यांनी या एजन्टकडे पैशाचा तगादा लावला. त्यानंतर या एजन्टने त्यांना सोन्याचा रंग मारुन एक किलो 109 ग्रॅम चांदीची बिस्कीटे दिली. 


अवैध सोने असल्याची खबऱ्याची टीप


पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एका व्यापाऱ्याकडे अवैध सोनं असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मिळाली. त्यातून या व्यापाऱ्याकडे एका सक्षम अधिकाऱ्याच्या नेतृत्तवात धाडही टाकण्यात आली. त्यातून सोन्याची चार बिस्किटे समजून ती जप्तही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


खोदा पहाड, निकला चुहा


जप्त करण्यात आलेली सोन्याची बिस्टीके चांदीची असल्याचे काही वेळाचच निदर्शनास आले. त्यामुळे पथकही निराश झाले. दुसरीकडे मिळालेल्या चांदीचा हिशोबही मिळाल्याने पोलिसांची कारवाई वादात आली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत दिलेल्या कारवाईची खबरीने दिलेली माहितीच चुकीची असल्याने कारवाईत चुक झाली अशी चर्चा संपूर्ण पोलीस विभागात होती.


कारवाईबद्दल पोलीस संभ्रमात


पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातील चांदीच्या बिस्कीटांच्या खरेदीच्या पावत्या आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने सादर केल्या आहेत. सोमवारी पुन्हा त्याबाबत पावत्या सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे नेमका कोणत्या आधारे गुन्हा दाखल करावा? असा प्रश्न पथकालाही पडला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात या; श्याम मानव यांचे बागेश्वर बाबांना चॅलेंज