VIRAL VIDEO : विकासकामांवर जाब विचारणाऱ्या वृद्ध महिलेलाच आमदाराचा प्रतिप्रश्न
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2019 05:07 PM (IST)
विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आणि आमदार केदार अडचणीत असताना काही स्थानिक काँग्रेस नेते पाठीमागे हसताना दिसत होते.
नागपूर : विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील प्रत्येक पक्षाने, प्रत्येक उमेदवाराने आपापल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच नागपुरात मतदार आमदाराला धारेवर धरण्याचा प्रसंग घडला. याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. नागपुरातील कळमेश्वर तालुक्यातातील परसोडी गावात विद्यमान आमदार आणि काँग्रेस नेते सुनील केदार प्रचार करत होते. प्रचारादरम्यान कांताबाई नावाच्या वृद्ध महिलेने गावात काम केले नाही केली नाही म्हणून सुनील केदार यांना धारेवर धरलं आहे. तसेच विकासकामांवरुनही त्यांना खडेबोल सुनावले. त्यावर आमदारानी ही त्यांची बाजू मांडत झालेले काम मीच केले आहे. तुम्हाला मी केलेले काम दिसत नाही आहे का असा प्रतिप्रश्नच सुनील केदार यांनी कांताबाईंना विचारला. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आणि आमदार केदार अडचणीत असताना काही स्थानिक काँग्रेस नेते पाठीमागे हसताना दिसत होते. पण आपली अडचण वाढत असल्याचे पाहत आमदारांनी तिथून निघून जाणे योग्य समजले.