नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) एमकेसीएल कंपनीला दिलेले परीक्षेचे काम तातडीने काढून घ्यावे व कंपनीला बाहेर करण्याच्या सूचना राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू प्रा. सुभाष चौधरी यांना दिल्या. विशेष म्हणजे कुलगुरूंनी आग्रह धरल्याने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीला परीक्षेचे कामकाज मागील सत्रापासून देण्यात आले होते. 'एमकेसीएल'ला (MKCL) काम देताना झुकते माप देणाऱ्या कुलगुरूंसहित सर्व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे 8 दिवसांत ही समिती आपला अहवाल देणार असून समितीसमोर सर्वच तक्रारींवर चर्चा होणार आहे. सुमारे 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत 'प्रोमार्क' (Promark) कंपनीला पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
कुलगुरूंची भूमिका आग्रही
- 6 वर्षांपूर्वी एमकेसीएलने परीक्षेचे काम अर्ध्यात सोडून विद्यापीठाला चांगलेच अडचणीत आणले होते.
- बैठकीदरम्यान परीक्षा विभागाच 'एमकेसीएल'ला काम देण्यापासून अनभिज्ञ असल्याची गंभीर बाब समोर आली.
- कुलगुरू चौधरी यांनी कंपनीला झुकते माप देत परीक्षेच्या कामकाज दिले. सिनेटसह महाविद्यालयांनी विरोध केला.
- चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असून ही समिती अहवाल तयार करणार आहे.
- 'एमकेसीएल'ला पुन्हा एकदा काम देणे कुलगुरू चौधरी यांच्या आंगलट येण्याची शक्यता आहे.
- विधानपरिषदेत मुद्दा मांडला
पावसाळी अधिवेशनात हा विषय सदस्य अभिजित वंजारी व प्रवीण दटके यांनी चर्चेत आणला. यावर उत्तर देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी रविवारी विद्यापीठामध्ये निकाल आणि 'एमकेसीएल' या प्रकरणावर बैठक घेतली. यावेळी विद्यापीठातून 'एमकेसीएल'चे काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी कुलगुरूंसह (VC) विद्यापीठाचे वरीष्ठ अधिकारी, आमदार अभिजित वंजारी, प्रवीण दटके, सिनेट सदस्य मनमोहन बाजपेयी, विष्णू चांगदे आदी उपस्थित होते.
कामकाजासाठी 'समर्थ'ची मदत
विद्यापीठाच्या विविध कामाकाजासह परीक्षेचे काम केंद्र सरकारच्या 'समर्थ' या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालविले जाणार असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले. तुर्तास परीक्षेचे सर्व काम सध्या अस्तित्वात असलेली प्रोमार्क कंपनी करणार आहे. अभिजित वंजारी व मनमोहन बाजपेयी यांनी सिनेटची भूमिका जोरकसपणे मांडली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Ganesh Chaturthi Nagpur : गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज; जाणून घ्या दर, असा करा अर्ज
Ganesh Chaturthi Nagpur : शहरात गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलाव, जाणून घ्या आपल्या घराजवळे विसर्जनस्थळ
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI