नागपूर: महावितरणकडून (Mahavitran) यंदाही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन संभाव्य अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. उत्सवातील देखावे, मंडपावर रोषणाई करताना वीजसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. देशभरात 31 ऑगस्ट  ते 9 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना (Ganeshotsav 2022) घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या 100 युनिटसाठी 4 रुपये 71 पैसे प्रति युनिट,  101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 69 पैसे प्रति युनिट, 301 ते 500 युनिटपर्यंत वीज वापरासाठी प्रति युनिट 11 रुपये 72 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी 13 रुपये 21 पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. 


गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी  घेतली जात नाही घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीजजोडणीमुळे मोठया दुर्घटना घडण्याची व त्यात जीवित शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळाना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.


मंडळांनी ही काळजी घ्यावी


मंडप व रोषणाईसाठी (Lightning) विद्युत व्यवस्था व संच मांडणी अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.  विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणेश उत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात (Ganesh Chaturthi) वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो  भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेवून वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ganesh Chaturthi Nagpur : शहरात गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलाव, जाणून घ्या आपल्या घराजवळे विसर्जनस्थळ


Ganesh Chaturthi 2022 : श्री संती गणेशोत्सव मंडळ साकरतोय वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती, भाविकांसाठी बुस्टर डोसचीही सुविधा