नागपूरः सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणूक ओबीसी (OBC Reservation) आरक्षणासह घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महानगरपालिकेत महिलांसाठी राखीव  सर्वसाधारण गटातील 18 जागा ओबीसी महिलांसाठी राखीव राहणार आहेत. याशिवाय खुल्या गटातून 17 जागा ओबीसींसाठी राहणार आहेत. त्यामुळे अनेकांची गणिते बिघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


निवडणूक (NMC Elections) आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवायच आरक्षण काढत निवडणुकीची प्रक्रिया केली होती. त्यानुसार महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गात 56 तर खुल्या सर्वसाधारण प्रवर्गात 57 जागा राखीव होत्या. त्यानुसार अनेकांनी अनुकूल गणिते मांडण्यास सुरुवात केली होती. आता ओबीसी आरक्षण खुल्या प्रवर्गातील जागातूनच काढण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच गणित जुळविणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. आता ओबीसींसाठी महापालिकेला 35 जागा आरक्षित कराव्या लागणार आहेत. महापालिका निवडणुकीत महिलांच्या पन्नास टक्के (Women reservation) आरक्षणानुसार महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील 18 जाग ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.


Aarey Metro Car Shed : आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक, देशभर 'आरे वाचवा' आंदोलनं


प्रभागरचना बदलण्याबाबतही चर्चा


सध्या तीन सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार आरक्षण काढण्यात आले आहे. ओबीसींचे आरक्षणही याचनुसार काढणे अपेक्षित आहे. परंतु, नवे सरकार आल्याने काहींनी चार सदस्यीय प्रभागाची चर्चा सुरू केली. चार सदस्यीय प्रभागाचा निर्णय झाल्यास निवडणूक आयोगाला प्रभागाचे सिमांकन, आरक्षण सारेच नव्याने करावे लागणार आहे. महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांतही ही चर्चा रंगली आहे.


उत्तर नागपुरात बदलावे लागतील प्रभाग


महानगरपालिकेत उत्तर नागपुरातील (East Nagpur) अुसूचित जातीचेही अनेकजण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढतात. यातील जागा ओसीबींसाठी राखीव झाल्यास त्यांच्यापुढे प्रभाग बदलण्याचीच स्थिती निर्माण होणार आहे. काही प्रभागात  महिलांच्या दोन जागांपैकी एक अनुसूचित जाती तर एक सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. याशिवाय पुरुषांना सर्वसाधारण खुल्या गटातून निवडणूक लढण्याची संधी होती. परंतु, आता खुल्या सर्वसाधारण गटातील 17 जागा ओबीसींसाठी आरक्षित होणार आहेत.


कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी