नागपूरः नागपूर महानगरपालिकेतील (NMC) जवळपास प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त (vacancy) आहे. याचा परिणाम थेट कामकाजावर होत आहे. दुसरीकडे काही राजकीय नेत्यांच्या 'आश्रयात' जवळपास प्रत्येक विभागातच खासगी एजन्सीची (Private Agency) नियुक्ती असून या 'खास' एजन्सीवर महिन्याकाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या महानगरपालिकेत अधिकाऱ्यांची 65 टक्के, तर कर्मचाऱ्यांची जवळपास 56 टक्के पदे रिक्त असल्याने कामकाजावरही परिणाम होत आहे. यासोबतच येत्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त (Retirement) होणार असल्याने याचा कामकाजासोबतच करवसुलीवर परिणामही होणार आहे, हे निश्चितच.


210 पदे मंजूर 95 कार्यरत


महानगरपालिकेत वर्ग-1 ची 210 पदे मंजूर आहेत. यातचील 95 पदे कार्यरत असून, 115 पदे रिक्त आहेत. म्हणजेच 55 टक्के रिक्त आहे. वर्ग-2 च्या मंजूर 67 पदापैकी फक्त 17 पदे कार्यरत असून 50 पदे रिक्त आहेत. याचा विचार करता वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांची 65 टक्के पदे रिक्त आहेत.


वर्ग-3 ची 3791 मंजूर, 2136 पदे रिक्त


वर्ग-3 ची 3791 पदे मंजूर असून 1655 पदे कार्यरत आहेत. 2136 पदे रिक्त आहे. म्हणजेच 56.36 टक्के पदे रिक्त आहे. वर्ग -4 च्या, 2760 मंजूर पदांपैकी 670 पदे कार्यरत असून 2090 पदे रिक्त आहेत. सफाई मजदूरांची 3939 पदे मंजूर असून 3745 पदे कार्यरत आहेत. तर 194 पदे रिक्त आहेत. तर सफाई मजदूर अधिसंख्या पदे 4407 मंजूर असून 3281 कार्यरत, तर 1126 पदे रिक्त आहेत. शिक्षकांची पदे मात्र पूर्ण भरलेली आहेत. 638 पदे मंजूर असून 851 कार्यरत आहेत. म्हणजे 213 शिक्षक अतिरिक्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून नोकरभरती बंद असल्याने रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे.


अग्निशमन विभागात 80 टक्के पदे रिक्त


नागपूर शहराचा विस्तार वाढत आहे. मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहत आहे. दुसरीकडे मनपाच्या अग्निशमन विभागात (Nmc Fire Department) 80 टक्के पदे रिक्त आहेत. या विभागात 872 पदे मंजूर असताना जेमतेम 158 कर्मचारी कार्यरत आहेत. कंत्राटी रुवरुपात काही पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, यातून समस्या मार्गी लागण्याची शक्यता नाही.


इतर बातम्या


Nagpur Crime : पत्नीने 40 हजारात दिली पतीला संपवण्याची सुपारी, महिलेसह चौघांना 29 पर्यंत कोठडी


Nitin Gadkari : नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क, 9 हजार गरजूंना नि:शुल्क सहाय्यक साधनांचे वितरण