नागपूरः प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध जिल्ह्यांत आरोग्यव्यवस्था बळकट करणारे डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे नागपूर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एमबीसीएस पूर्ण केल्यानंतर आयएसएसची परीक्षा देऊन सनदी अधिकारी झालेल्या डॉ. इटनकर यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला
नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पद पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आर. विमला यांना पुणे येथे बाल कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. विपीन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मुळचे चंद्रपूर येथील असून 2014 च्या तुकडीचे आय.ए.एस. अधिकारी आहे. यु.पी.एस.सी. परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम तर देशातून चौदावा क्रमांक मिळविला होता. त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. केले आहे.
डॉ. विपीन इटनकर 2014च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम तर देशात 14 वा क्रमांक मिळवला होता. सन 2017मध्ये लातूर जिल्हापरिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.
म्हणून झाले आयएएस
मुलाने इंजिनीअर व्हावे, ही डॉ. इटनकर यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील करिअर निवडले. त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (मेयो) एमबीबीएस केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात सेवाही सुरु केली होती. मात्र, चंदीगड येथे राहणाऱ्या डॉ. शालिनी यांच्याशी त्यांना विवाह करायचा होता. डॉ. शालिनी यांच्या वडिलांनी आयएएस बनला तरच लग्नाला होकार देईल, अशी अट ठेवली. डॉ. इटनकर यांनी हे आव्हान स्वीकारले.
बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल, आतापर्यंत 43,3121 नागरिकांनी घेतली प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्रा
अल्पकाळ, तरी अविस्मरणीय
आर. विमला यांनी 9 जुलै 2021मध्ये नागपूरचा जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकरली होती. त्यांना येथे काम करण्यासाठी अल्पकाळ मिळाला असला तरी त्यांनी या काळात महत्त्वपूर्ण कामे केली. 388 सिंधी नागरिकांना दाखले मिळवून दिले. कोरोना काळात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यापासून ते अनाथांना मदत पोहचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ब्रेक दी बायस या उपक्रमात 35 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. नागपूरचा कार्यकाळ कमी असला तरी अविस्मरणीय ठरला असल्याची भावना आर. विमला यांनी व्यक्त केली.