Nagpur Crime : राज्याची उपराजधानी नागपूरात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेली हत्येच्या घटनांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही.. त्यामुळे,सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. गेल्या काही तासामध्ये नागपूर शहरातील सक्करदार आणि वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. दोन्ही घटना गुंडामधील वर्चस्व आणि गँगवॉरमधून झाल्याची माहिती आहे.
गँगच्या म्होरक्याला दगडाने ठेचून संपवलं
सक्करदरा भागातील सेवादलनगर येथील एका गँगच्या म्होरक्याचा जमावाने दगडांनी ठेचून खून केला. मिळालेल्या माहितीप्रमाणे बीट्स गँगचा मोहरक्या असलेला अमोल पंचम बहादुरे याने गेल्या आठ वर्षांपूर्वी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरंगा चौकात एका युवकाचा भरचौकात खून केला होता. तेव्हापासून त्याचा तिरंगा चौकात त्याचा दबदबा होता. तेव्हापासूनच तो खंडणी आणि भूखंड बळकावण्याचे काम करीत होता. त्याने दोन साथीदारांच्या मदतीने मुरुम आणि अन्य गौणखनिज विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. याशिवाय तो व्याजाचा अवैध व्यवसाय होता. त्यासाठी त्याने घोगली परिसरातमध्ये अलिशान कार्यालय घेतले होते. अमोल आणि कुख्यात गुंड दिनेश गायकी चिमणाझरी येथील खदानीच्या पैशावरुन वाद सुरु होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी दिनेश गायकी हा कारागृहातून सुटून आला होता. अमोलने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दिनेश चिडून होता, दोघांमध्ये वाद वाढतं होता. दिनेशने साथीदार प्रवीण ढिंगे, शुभम हटवार,प्रतिक गाठे यांच्यासह जवळपास 30 साथीदार सेवादलनगरात जमा झाले. त्यांनी अमोलला फोन करुन तेथे बोलावले. रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अमोल त्याच्या दोन साथीदारांसह कारने तेथे पोहचला. अमोल दिसताच आरोपींनी कारला घेराव घातला. आरोपींचा डाव लक्षात आल्याने घाबरेला अमोल कारमधून बाहेर निघत नव्हता. त्यामुळे आरोपींनी त्याच्या कारच्या चारही बाजूच्या काचा फोडून, त्याला बळजबरीने कारमधून बाहेर खेचले आणि भरचौकात त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. तर अमोलचे साथीदार अमित भुसारी व बंटी या दोन्ही दोघांना गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरा सक्करदरा पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली,त्यानंतर घटनास्थळावरुन मृतदेह रुग्णालयाकडे रवाना केलाय.
कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराचा गुंडांच्या टोळीकडूनच खून
कारागृहातून सुटून आलेल्या अट्टल गुन्हेगाराचा गुंडांच्या टोळीने चाकूने भोसकून खून केलाय. वाठोड्यात दहशत असलेल्या अमोल कृष्णराव वंजारी (२२) याचा वस्तीतील गुंड एस प्रधान राजन उईके ऊर्फ गब्बर याच्याशी वस्तीतील वर्चस्वावरुन वाद सुरु होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी अमोलने जीवे मारण्याची धमकी देऊन गब्बरवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी गब्बरने वाठोडा पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी अमोलला अटक केली. गेल्या दोनच दिवसांपूर्वी अमोल कारागृहातून सुटून आला. आता अमोल आपला गेम करेल अशी भीती गब्बरला होती. त्यामुळे त्याने तेजस मेंढे आणि दोन अल्पवीयन साथीदारांच्या मदतीने अमोलचा काटा काढण्याचा कट रचला आणि बुधवारी रात्री त्याने तीन साथीदाराच्या मदतीने डंम्पींग यार्डच्या भींतीजवळ बसलेल्या अमोलला गाठले आणि चौघांनीही मिळून अमोलवर चाकूने सपासप वार करुन त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवित त्याची हत्या केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या