नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी  (Dr. Subhash Chaudhary) यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यालयात कुलगुरू डॉ. चौधरी  यांच्याविरोधातील वेगवेगळ्या तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर चौधरी यांना बडतर्फ करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे  यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.


राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या कार्यालयात कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याविरोधातील वेगवेगळ्या तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी घेतलेल्या सुनावणीदरम्यान त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले.


नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. 


गेल्या वर्षीही डॉ. सुभाष चौधरी अडचणीत सापडले होते. नागपूर विद्यापीठात एमकेसीएलमार्फत (MKCL) ऑनलाईन परीक्षा घेणे आणि त्याचा निकाल लावण्याबद्दल चौकशी समितीच्या अहवालाने त्यांच्यावर ठपका ठेवला होता. ही पद्धत नियमबाह्य असल्याचं सांगत कुलगुरूंना फटकारलं होतं. त्यानंतर चौधरी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली होती. 


ही बातमी वाचा: