Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस डिग्री बनवून थेट इराक मध्ये अनेकांनी नोकऱ्या मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. इराकच्या भारतातील दूतावासाने नागपूर विद्यापीठाला संपर्क साधला असता  सुरवातीला 27 तरुणांचा नागपूर विद्यापीठाची कधीही शैक्षणिक संबंध नसताना नागपूर  विद्यापीठाच्या  बोगस डिग्र्या बनवून  इराक मध्ये नोकरी मिळवली . आता यात आणखी काही नावांची भर पडण्याची शकता वर्तवली जात आहे. मात्र विद्यापीठाने पोलिसांना रीतसर तक्रार केली नसल्याने आता भाजपने देशाचे हीत व विद्यपीठाच्या प्रतिष्ठे खातर आपण पोलिसात तक्रार करणार असल्याची भूमिका घेतली आहे.


नागरिकत्व इराकचे... नोकरी इराकमध्ये... मात्र शैक्षणिक डिग्री मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची व तीही बोगस ...इराक सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेची व्हेरिफिकेशन केले असता त्यांना काही कर्मचाऱ्यांच्या व्हेरिफिकेशन पत्रावर संशय आला. सुरुवातीला  इराक सरकारने भारतातील इराक दुतावासाकडे संपर्क साधले, त्यानंतर इराकच्या भारतातील दूतावासाने नागपूर विद्यापीठाला संपर्क साधून चौकशी केली असता पहिल्या यादीत 27 कर्मचाऱ्यांनी नागपूर विद्यपीठाच्या साधार केलेल्या  डिग्री बोगस असल्याचे पुढे आहे .. पैकी बहुतांशी प्रकरण 2019 आणि 2020 दरम्यानचे आहे.. 27 बोगस डिग्री पैकी सर्वाधिक 24 फार्मसी विद्या शाखेतील आहे... तर 2 अभियांत्रिकी शाखेचे असून 1 बोगस डिग्री मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमाची आहे... विशेष म्हणजे हे बोगस डिग्री तयार करताना विद्यापीठाच्या त्या काळातील सक्षम अधिकाऱ्यांच्या नावाने बोगस डिग्रीवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या आहेत.


विशेष बाब म्हणजे सर्व आरोपी इराणी तरुण असून त्यांनी त्यांच्या शासनाची फसवणूक केली. इराक मध्ये इराक सरकारने गुन्हा देखील दाखल केला मात्र बोगस डिग्री तयार करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या नावाचा वापर केला. आंतराष्ट्रीय स्तरावर देशाचे व विद्यपीठाचे नाव खराब होत असल्याने पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करून घेणे अपेक्षित होते मात्र यासाठी  विद्यापीठ पुढाकार घेत नसल्याने गुन्हा दाखल करून घेण्यास भाजप  पुढाकार घेणार असल्याचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. इराकच्या तरुणांनी नागपूर विद्यापीठाच्या बोगस डिग्र्यांचा  वापर करून इराकमध्ये नोकऱ्या मिळवल्या  असा हा संपूर्ण प्रकार दिसत आहे. मात्र  या प्रकरणाची धागेदोरे नागपूर विद्यपीठात कोणाशी जुडली गेली नाही ना याचा तपास पोलिसांना करायचा आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI