Nagpur, School Student drowned : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात बोरी गावाजवळ चार शाळकरी मुलं कालव्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बोरी गावाजवळ इंदिरा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आज (दि.14) दुपारी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे.
आठ मुलं पोहोयला गेली, 4 जण पाण्यात उतरले
अधिकची माहिती अशी की, बोरी गावाजवळ इंदिरा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. आठ पैकी चार मुलं पाण्यात उतरले. मात्र तेव्हा कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे ते स्वतःला सावरू शकले नाहीत. पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले.
चौघेजण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची भीती
अद्याप एकही मुलाचा पत्ता लागू शकलेला नाही. चौघेजण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून चारही मुलांचा शोध कार्य सुरू आहे. मात्र अद्याप त्यात यश मिळाले नाही. कालव्यात बुडालेले सर्व विद्यार्थी सातव्या त्या अकराव्या वर्गा दरम्यानचे असल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात बोरी गावाजवळ चार शाळकरी मुलं कालव्यात बुडाल्याची भीती...
बोरी गावाजवळ इंदिरा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आज दुपारी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते...
आठ पैकी चार मुलं पाण्यात उतरले... मात्र तेव्हा कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे ते स्वतःला सावरू शकले नाही आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले...
अद्याप एकही मुलाचा पत्ता लागू शकलेला नाही... चौघेजण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे...
पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून चारही मुलांचा शोध कार्य सुरू आहे... मात्र अद्याप त्यात यश मिळाले नाही...
कालव्यात बुडालेले सर्व विद्यार्थी सातव्या त्या अकराव्या वर्गादरम्यानचे असल्याची माहिती आहे...
इतर महत्त्वाच्या बातम्या