नागपूर : नागपुरातील भाजपच्या नेत्या सना खान यांच्या हत्याप्रकरणातील (Sana Khan Murder Case) तपासात मोठी माहिती समोर येत आहे. नागपूर पोलिसांना (Nagpur Police) आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग हे सना खान यांचेच असल्याचं तपासात उघड झालं आहे. रक्तातील डीएनए आणि सना खान यांच्या आईच्या रक्ताचे डीएनए (DNA) पूर्णपणे मॅच झाले आहेत. नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबमधील तज्ञांनी त्या संदर्भातील गोपनीय अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सोपवल्याची एबीपी माझाची खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 


मध्य प्रदेशाच्या जबलपूरमधील ज्या घरी सना खानची हत्या झाली, तिथल्या सोफ्याच्या फोममध्ये रक्ताचे सुकलेले डाग आढळले होते. ज्या लाकडी दांडुक्याने अमित साहूने सना खानची हत्या केली, त्यालाही रक्ताचे डाग लागले होते. अमित साहूच्या कारमध्येही आढळलेले रक्ताचे डीएनएही सना खान यांच्या कुटुंबीयांच्या डीएनएसोबत मॅच झाले आहेत. त्यामुळे सना खान यांचा मृतदेह अजून सापडला नसला तरी फॉरेन्सिक अहवालामुळे अमित साहूला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी भक्कम पुरावे आता निर्माण झाले आहेत.


सना खान हत्या प्रकरण नेमकं काय?


सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या होत्या. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या.  मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील हॉटेल व्यवसायिक अमित साहू उर्फ पप्पूसोबत त्यांची मैत्री होती. काही जण दोघांनी लग्न केल्याचाही दावा करतात. त्याच अमित साहूसोबत 1 ऑगस्टच्या संध्याकाळी सना खान यांचं व्हिडीओ कॉलवर जोरदार भांडण झालं. कधीकाळी अमित साहूला भेट म्हणून दिलेली सोन्याची चेन त्याच्या गळ्यात दिसून न आल्यामुळेच रागवलेल्या सना खान यांनी जबलपूरचा मार्ग धरला होता. सना खान या जबलपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरुप पोहोचल्याचं कळवलं होतं.  पण, सनाने त्यांच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यादेखील पुन्हा परतल्याच नाहीत. त्यानंतर अमित साहूने हत्या केल्याची कबुली दिली होती. परंतु त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. 


सना खान यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस


दरम्यान, सना खान यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भाजप पदाधिकारी सना खान 2 ऑगस्टपासून जबलपूर इथून बेपत्ता झाल्या होत्या. अमित शाहूने सना खान यांची हत्या करुन मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली होती. मात्र अजूनपर्यंत सना खान यांचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही.


VIDEO : Sana Khan Case Update : सना खान तपासात सापडलेलं रक्त सना खानचेच, डीएनए अहवालात उघड



हेही वाचा


Sana Khan Case : सनाचा मुलगा वारंवार तिच्या मृतदेहाबाबत विचारणा करतोय, त्याला काय उत्तर द्यावं?; सना खान यांच्या आईचा नागपूर पोलिसांना प्रश्न