Nagpur Rain : राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पावासामुळं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, नागपूर (Nagpur) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. दरम्यान, हिंगणा भागातील वेणा नदीला पूर आला आहे. यामध्ये काही नागरिक अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 


रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. नागपूरमध्ये रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत 164 मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद झाली आहे. त्यामुळं या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. मात्र, दुसरीकडे अंबाझरी तलाव ओहरफ्लो झाल्याने पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत. अंबाझरी ओव्हरफ्लो झालेला बघायला पर्यटकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पर्यटकांना पाण्यापासून दूर राहिण्याचा सल्ला दिला आहे. 


नागपुरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप


नागपूरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नागपूरच्या नरेंद्रनगर पुलाखाली दोन ट्रक पाण्यात अडकले आहेत. तसेच नागपूर विमातळाच्या प्रवेशदारावर भयानक चित्र आहे. विमानतळावर प्रवेश करणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. आजचा  दिवस पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बांगाच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूर वेध शाळेने हा अलर्ट दिला आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदरी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुसळधार पावसामुळं हिंगणा भागात वेणा नदीला पूर आल्याने काही नागरिक अडकले आहेत.  विटभट्टी, मिहान रोड इथं 8 पुरुष, 5 महिला, 3 मुले पुरामध्ये अडकले आहेत. बोटेची आवश्यकता आहे. सध्या रेस्क्यु ऑपरेशन सुरु झालं आहे. 


पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना सुखरुप काढलं बाहेर


वेणा नदीला आलेल्या पुरात 16 नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या पथकाने या 16 लोकांना सुखरुप बाहेर काढले आहे. वेणा नदी आणि नाल्याच्या मधल्या भागात वीटभट्टीवर काही मुजारांच्या कुटुंबांचे वास्तव्य होते. रात्री अचानक आलेल्या पावसानं या नागरिकांना बाहेर निघणे अवघड झाले होते. शेवटी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. त्यानंतर या सर्व नागरिकांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : आज राज्यात कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट, मुंबईसह काही भागात शाळांना सुट्टी; वाचा हवामान विभागाचा अंदाज