नागपूर : बहुप्रितिक्षीत नागपूर मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोदी यावेळी म्हणाले की,ऑरेंज सिटी नागपूरचे 'माझी मेट्रो'साठी खूप अभिनंदन. याप्रसंगी मला दुप्पट आनंत होत आहे. मी या मेट्रोचे भूमिपूजन केले आणि आज मीच या प्रकल्पाचे उद्घाटन करत आहे. या मेट्रोमुळे नागपूरमधील परिवहनामध्ये खूप बदल होणार आहेत.
मोदी म्हणाले की, "हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा नागपूरचा मोठा जनसामुदाय मेट्रोने प्रवास करेल. देशात अनेक मेट्रो आहेत. परंतु नागपूर मेट्रो देशातील पहिली ग्रीन मेट्रो आहे. नागपूर हे देशातील वेगाने विकसित होणारे एक शहर आहे. इथली लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे."
मोदींनी सांगितले की, "नागपूर मेट्रो निर्माण होत असताना नागपूरमध्ये 20 हजार तरुणांना रोजगार दिला. नागपूर असो किंवा मुंबई असो आम्ही 21 व्या शतकात गरजेची असलेली वाहतूक प्रणाली लोकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या सरकारने त्यासाठी अनुकूल अशी पॉलिसी आणली, ज्यामुळे मेट्रो बनवण्याची गती वाढली आहे."
मोदी म्हणाले की, "जून महिन्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी यावं, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आमंत्रण मी स्वीकारत आहे. पुढच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी पुन्हा नागपूरमध्ये येईन."
नागपूर मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, उद्यापासून लोकांच्या सेवेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2019 06:23 PM (IST)
बहुप्रितिक्षीत नागपूर मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -