नागपूर : अवघ्या काही हजार रुपयांमध्ये 10वी, 12वी, पदवी आणि एमबीएची डिग्री वाटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा ठाणे क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. ही टोळी नागपूरमधून संपूर्ण काम करत होती. न शिकलेले, नापास झालेले अनेक तरुण या टोळीकडून बनावट प्रमाणपत्र खरेदी करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळीचं जाळं केवळ महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे.


पोलिसांनी सांगितले की, ज्या डिग्रींचं ही टोळी वाटप करत आहे, त्या डिग्री आणि खऱ्या डिग्रींमध्ये काहीही फरक नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ मॅनेजमेंट या नावाने चालवल्या जाणाऱ्या संस्थेच्या आड हे रॅकेट कार्यरत होते. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद फजल याच्यासह पाच महिलांना अटक केली आहे. या टोळीकडे 1000 पेक्षा अधिक डिग्री, शाळा आणि महाविद्यालयांच्या बोर्डांची प्रमाणपत्र मिळाली आहेत. दरम्यान पोलिसांच्या छाप्यानंतर या टोळीचा म्होरक्या फरार झाला आहे.

प्रमाणपत्र/डिग्रींची किमंत
10 वी (एसएसएसी, सीबीएससी बोर्ड): 50 हजार रुपये
12 वी (एचएसएसी, सीबीएससी बोर्ड): 75 हजार रुपये
महाविद्यालयीन डिग्री (पदवी): 1 लाख रुपये
इंजिनिअरिंग आणि एमबीए : 1.50 लाख ते 2 लाख रुपये