नागपूर : महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही, लिहून घ्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा-विधानसभा एकत्र निवडणुकीच्या चर्चांवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी मुख्यमंत्र्यांना एकत्र निवडणुकीविषयी विचारलं यावेळी गाडीत बसताना त्यांनी लिहून घे, महाराष्ट्रात होत नाही, म्

लोकसभेसोबतच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं आहे.


मुदतपूर्व निवडणुकीच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांनी या विधानामुळे पूर्णविराम दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसंच प्रलंबित बाबींवर शासन निर्णय जारी करण्यात आले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. आज नागपुरात मुख्यमंत्र्याना यासंबंधी विचारण्यात आला. यावेळी महाराष्ट्रात होत नाही, लिहून घ्या, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.