Nagpur Fire : नागपूरच्या महाल परिसरातील जय कमल कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी साडेसात ते 8 वाजण्याच्या दरम्यान इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेत ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्रचंड धुरामुळे दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
या इमारतीत एका सदनिकेत इव्हेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या आतिषबाजीशी संबंधित काही ज्वलनशील पदार्थ साठवलेले होते. त्यातून आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा संपूर्ण भाग अत्यंत व्यवस्त आणि वर्दळ असलेल्या बाजारपेठेचा परिसर असल्यामुळे आग लागली तेव्हा प्रचंड धावपळ उडाली होती.
आगीची माहिती मिळताच नागरिकांनी लगेच अग्निशामक दलाला बोलावले. अग्निशमाक दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले असून सध्या पाण्याचे फवारे मारून कुलिंग करण्याचे काम केले जात आहे. या आगीत तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांना बोलावण्यात आले असून त्यांच्या मदतीने आगीवर आता पूर्णपणे नियंत्रण मिळाले आहे. सध्या आग पुन्हा भडकू नये म्हणून कुलिंग करण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे.
भिवंडीसह छत्रपती संभाजीनगमध्येही आग लागल्याची घटना
भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील प्रितेश कॉम्प्लेक्समधील केमीकलच्या गोदामात भीषण आग (Bhiwandi fire) लागल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोदामात मोठ्या प्रमाणावर केमिकल साठवलेले असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले आहे. सतत मोठमोठे स्फोट होत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.या भीषण आगीत संपूर्ण केमिकल गोदाम जळून खाक झाले आहे. धुराचे लोळ आठ ते दहा किलोमीटर अंतरावरुनही स्पष्टपणे दिसत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या आगीत सुमारे 10 ते 12 गोदामे पूर्णतः भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या घनदाट धुरामुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशा आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अजून समोर आलेले नाही.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील केमिकल कंपनीला ( chemical company ) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. पैठण एमआयडीसीमध्ये ही कंपनी असून, मोठी आग लागली आहे. केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे, त्यानंतर ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ही आग नेमकी कशमुळं लागली? कंपनीत स्फोट नेमका कसा झाला? याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या:
छत्रपती संभाजीनगरमध्ये केमिकल कंपनीत मोठा स्फोट, कंपनीला भीषण आग, अग्निशामक दल घटनास्थळी