नागपूर : नागपुरात गुन्हेगार वेगवेगळ्या युक्ती करुन पोलिसांच्या दोन पावले पुढेच राहतात. आता तर एका पट्ठ्याने चक्क नकली क्राईम ब्रान्च म्हणजेच गुन्हे अन्वेषण शाखाच सुरु केली होती. नागपूरच्या समर्थनगर भागात एका भाड्याच्या घरात क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सी नावाने ही नकली क्राईम चालवली जात होती. नरेश पालरपवार नावाचा हा आरोपी ही क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सी चालवत होता.


पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल (22 फेब्रुवारी) संध्याकाळी पोलिसांनी क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सीच्या कार्यालयावर धाड टाकून नरेश पालरपवारला ताब्यात घेतले आहे. त्याच्या कार्यालयातून काही कागदपत्रे ही पोलिसांनी जप्त केली आहेत.

नरेश पालरपवारने क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सीच्या माध्यमातून काही अशिक्षित लोकांना आम्ही तुमच्या प्रकरणाचा तपास करुन देतो, असं सांगून फसवणूक केल्याची पोलिसांना शंका आहे. धक्कादायक म्हणजे नरेश पालरपवार याने स्वतःच्या कारवर डायरेक्टर क्राईम इन्वेस्टिगेशन एजेन्सी असं बोर्डही लावलं होतं आणि तो शहरभर फिरतही होता.

आता पोलीस जनतेला न्याय देण्यास अपयशी ठरतात म्हणून अशा भामट्यांचा फावते का असा प्रश्न आता नागपुरात चर्चिला जात आहे.

वेबसाईट व्हिडीओ


यूट्यूब व्हिडीओ