नागपूरः  श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विन नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदात व उत्साहात सुरुवात झाली असून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात मातेचे गर्भगृह दररोज 22 तास भाविकांसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना प्रसन्नतेने व आनंदाने मातेचे आशीर्वाद घेता येणार आहे. नवरात्री दरम्यान दररोज रात्री तीन ते चार वाजेपर्यंत शृंगार आरतीची तयारी करण्यासाठी दुपारी 11.30 ते 12 आणि संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत दरम्यान भाविकांना मातेचा गाभारा दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी ग्रामपंचायत, महादुला नगरपंचायत व जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. भाविकांना दर्शन अधिक सुखकर होईल यासाठी संस्थांननी विविध व्यवस्था केली आहे. 


दर्शन रांगांमध्ये भाविकांना पाणी, पंख्याची सोय


दर्शन रांगांमध्ये (Darshan queue) प्रत्येक ठिकाणी पाणी, पंखे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. मंदिर परिसराची स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आदींना प्राथमिकता दिली जात आहे. सर्वसाधारण भाविकांना दर्शन घेताना अडचण येऊ नये म्हणून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. 


व्हीव्हीआयपीसाठी वेगळे प्रवेशद्वार


व्हीव्हीआयपीसाठी दर्शनाची वेगळे प्रवेशद्वार राहणार आहे. आजीवन अखंड ज्योतीच्या पास धारकांसाठी वेगळे प्रवेशद्वार तर देणगी शुल्क देऊन विशेष अतिथींच्या प्रवेशासाठी वेगळे प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. भाविकाने प्रत्येकी शंभर रुपये देणगी शुल्क देऊन विशेष अतिथी दर्शनाची व्यवस्था संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी प्रवेशद्वारावरच लाइन पद्धतीनेही प्रवेश पास प्राप्त करून देता येईल. त्यासाठी संस्थांननी क्यू आर कोडची व्यवस्था केलेली आहे. 


2000 सामुहिक ज्योतीने उजळणार


दोन हजार सामुहिक ज्योतीने उजळणार मातेचा परिसर यावर्षी दोन हजारावर सामूहिक अखंड मनोकामना ज्योतीचे प्रज्वलन केले जाणार आहे. दोन आजीवन अखंड मनोकामना ज्योती व दोन हजार सामुहिक अखंड मनोकामना ज्योती यावर्षी जळणार आहेत. दोन वर्षापासून यात बदल करून तांब्याच्या गळव्याऐवजी रंगविलेले मातीचे मडके वापरले जातात या सामुहिक घटाखाली पूर्वी वाळू वापरली जात होती यावर्षीपासून मातीचा वापर केला जात आहे.  भाविकांच्या दृष्टीने सर्व तयारी झाल्याची माहिती संस्थांनचे सचिव दत्तू समरीतकर यांनी दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Garba: 'गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या'; विश्व हिंदू परिषदेची मागणी


सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आधार कार्ड देऊ, पण गरबा कार्यक्रमांना धार्मिक रंग नको; विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर तरुणांची प्रतिक्रिया