Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय कंत्राटदाराने ळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. पीव्ही वर्मा असं या कंत्राटदाराचे नाव आहे. जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांचे थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीव्ही वर्मा यांचे वर्धा जिल्ह्यात एमआयडी देवळी येथे काम सुरु होते. या दरम्यान जवळपास चाळीस कोटी रुपयांची त्यांची थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होती. त्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. नागपूरच्या राजनगर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Nagpur Crime News)

Continues below advertisement

त्यांची 40 कोटींहून अधिकचे सरकारी बिल थकल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात येत आहे. पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा उर्फ मुन्ना वर्मा (61) असे या कंत्राटदाराचे नाव असून, ते अभिनेता प्रभास याचे मेहुणे होते. राज्यात थकबाकीचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक जण नैराश्यात जात आहेत. वर्मा श्री साई असोसिएट्स नावाच्या फर्मच्या माध्यमातून कंत्राट घेत होते, अशी माहिती आहे.

पीव्ही वर्मा अभिनेता प्रभासचे मेहुणे

कंत्राटदार वर्माची कामे ही अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू होती. देयके थकल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. ते राजनगरच्या फ्लॅटमध्ये एकटे राहत होते, तर त्यांचे कुटुंबीय हैदराबादमध्ये राहत होते. काल (सोमवारी) सकाळी वर्मा यांनी त्यांच्या घरी गळफास घेतला. मित्र महेश बियाणी हे त्यांना भेटण्यासाठी आले तेव्हा ही बाब समोर आली आहे. अभिनेता प्रभासचे वर्मा हे मेहुणे होते. प्रभास त्यांच्या पत्नी अनुराधा यांचा मामेभाऊ आहे. वर्माचे आजोबा 1962 मध्ये व्यवसायासाठी रामटेकला आले होते. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Continues below advertisement

राज्यात कंत्राटदाराचे जवळपास 90 हजार कोटींची बिल थकीत 

राज्यभरात जवळपास 90 हजार कोटी कंत्राटदाराचे बिल थकीत असून बहुतांश कंत्राटदार आर्थिक संकटात असल्याची प्रतिक्रिया राज्य कंत्राटदार संघटनेच्या एम सरोदे यांनी दिलीय. त्यातूनच हि दुर्दैवी घटना घडल्याचे ते म्हणाले. सोबतच पोलिसांनी आणि शासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आली आहे.

 

आणखी वाचा - Nagpur News : शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल; थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने गळ्याला दोर लावला; नागपुरातील खळबळजनक घटना