Nagpur News : नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात शासकीय कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. पीव्ही वर्मा असं या कंत्राटदाराचे नाव असून वेळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांचे थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, पीव्ही वर्मा यांचे वर्धा जिल्ह्यात एमआयडी देवळी येथे काम सुरु होते. या दरम्यान जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांची थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होती. त्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. नागपूरच्या राजनगर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.


राज्यभरात कंत्राटदाराचे जवळपास 90 हजार कोटींची बिल थकीत - एम सरोदे


राज्यभरात जवळपास 90 हजार कोटी कंत्राटदाराचे बिल थकीत असून बहुतांश कंत्राटदार आर्थिक संकटात असल्याची प्रतिक्रिया राज्य कंत्राटदार संघटनेच्या एम सरोदे यांनी दिलीय. त्यातूनच हि दुर्दैवी घटना घडल्याचे ते म्हणाले. सोबतच पोलिसांनी आणि शासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आली आहे.


फोन लावण्यावरून दोन बंदीवानांमध्ये तुंबळ हाणामारी; भंडारा मध्यवर्ती कारागृहातील प्रकार


फोन लावण्याच्या शाब्दिक वादातून दोन बंदीवानांमध्ये वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात एक बंदीवान जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घडली. दिनेश अग्रवाल असं जखमी झालेल्या बंदिवानाचं नावं असून त्याच्यावर सम्येत उर्फ पोंग्या दाभणे या स्थानबद्ध केलेल्या बंदिवानानं हल्ला करून जखमी केलं. बंदीवानांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून बोलता यावं याकरिता कारागृह परिसरात अँलन कार्ड लावण्यात आलेले आहे. इथे या दोघांमध्ये ही मारहाण झाली. या प्रकरणाचा आता भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या